एक्स्प्लोर

त्यांच्यावर कारवाई कधी?, मी जवळून पाहिलंय; UPSC परीक्षेतील बोगसगिरीवर प्रियंका गांधींचा संताप

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर बोगस प्रमाणपत्रावरुन प्रशासन चांगलंच ढवळून निघालं आहे

मुंबई : राज्यात अगोदर स्पर्धा परिक्षांच्या पेपरफुटीवरुन किंवा चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता करुन सरकारी नोकरी प्राप्त केल्याची प्रकरणे समोर येत होती. मात्र, थेट युपीएससी (UPSC) सारख्या केंद्रीय आयोगाच्या परीक्षेत बोगस प्रमाणपत्र सादर करुन चक्क आयएएस पदाला गवसणी घातल्याचा प्रकार उघडकीस आल्याने राज्यासह देशभरात खळबळ उडाली आहे. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. यापूर्वी नीट परीक्षा आणि युजीसी नेट परीक्षांचा असाचा सावळा-गोंधळ पाहायला मिळाला होता. त्यानंतर, आता चक्क युपीएससी परीक्षेतील ही बोगसगिरी पुढे आल्यानंतर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केंद्र सरकारला सवाल केले आहेत. तसेच, युपीएससी परीक्षा देणारे विद्यार्थी किती मेहनत घेतात, हे मी स्वत: पाहिलंय, असेही प्रियंका गांधी यांनी म्हटलंय.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर बोगस प्रमाणपत्रावरुन प्रशासन चांगलंच ढवळून निघालं आहे. केवळ, राजकीय नेत्यांच्याच बोगसगिरीवरुन, भ्रष्टाचारावरुन सातत्याने प्रश्न विचारले जातात. मात्र, पूजा खेडकर यांच्यामुळे प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे काळे कारनामे आता समोर येत आहेत. एकापाठोपाठ एक असे अनेक बोगस अधिकारी या घटनेनंतर समोर आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, पूजा खेडकर यांचं प्रकरण माध्यमांत आल्यानंतर आता युपीएससीने दखल घेत, पूजा खेडकर यांना नोटीसही बजावली आहे. तुमच्यावर फौजदारी गुन्हा का दाखल करु नये, अशा शब्दात आयोगाने खेडकर यांच्यावरील कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेमुळे युपीएससी परीक्षेतही बोगसगिरी चालत असेल तर सर्वसामान्यांनी परीक्षा द्यायच्या की नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही ट्विट करुन सरकारला प्रश्न विचारले आहेत. 

युवकांच्या विश्वासावर मोठा आघात

मी स्वत: युपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी दिवसरात्र एक करुन मेहनत घेताना, आपल्या भविष्याची स्वप्न रंगवताना पाहिले आहेत. त्यामुळे, युपीएससी परीक्षेतील घोटाळ्याचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे, कारण या प्रक्रियेतील एकही बोगसगिरी अनेक प्रश्न उपस्थित करते. लाखो युवकांचे स्वप्न आणि त्यांच्या विश्वासावर मोठा आघात करते. त्यामुळेच, जनता आणि युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

प्रमाणपत्र तपासणीची व्यवस्था निर्माण होईल का?

राजकीय हस्तक्षेपाने या उच्च पदावर नियुक्त झालेले लोकच यास जबाबदार आहेत? जर असतील तर त्यांच्यावर कारवाई कधी, असाही सवाल प्रियंका गांधींनी विचारला आहे. तसेच, नकली प्रमाणपत्रामुळे एससी, एसटी, ओबीसी, विकलांग व ईडब्लूएस प्रवर्गातील उमेदवारांना मिळणाऱ्या संधीवर बाधा आणतो. त्यामुळे, हे प्रमाणपत्र तपासणी करणारी एखादी संस्था विकसित केली जाईल का?, असेही प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खडेकर यांन मसुरी येथील प्रशिक्षणार्थी केंद्रात परत बोलवण्यात आले आहे. मात्र, त्या सध्या वाशिम जिल्ह्यातच असल्याचे समजेत. त्यांच्यावरील कारवाईलाही सुरुवात झाली आहे. 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
NCP Sharad Pawar MP Meets Narendra Modi Delhi: देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget