इंधन दरवाढ सुरुच, पेट्रोल 28 पेसै तर डिझेल 18 पैशांनी महागलं
मुंबई : इंधन दरवाढीची मालिका सोळाव्या दिवशीही सुरूच आहे. पेट्रोलचे दर आज 28 पैशांनी तर डिझेलचे दर 18 पैशांनी वाढले आहेत. मुंबईत पेट्रोल प्रतिलीटर 89.30 रुपये तर डिझेल प्रतिलीटर 78.24 रुपये पैशांनी मिळत आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा चढता आलेख कायम राहिल्यास लवकरच पेट्रोल शंभरी गाठेल.
अनेक शहरांमध्ये पेट्रोलची नव्वदी पार राज्यातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. पुणे, औरंगाबाद, परभणी, नांदेड, अमरावती, सोलापूर इत्यादी शहरांमध्ये पेट्रोलचे दर नव्वदी पार गेल आहेत. तर इतर शहरांतही दर नव्वदीकडे वाटचाल करत आहेत.
मुंबईत 15 दिवसात 3.21 पैशांनी महागलं गेल्या 15 दिवसात पेट्रोल सातत्याने महागलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 सप्टेंबरला मुंबईतील पेट्रोलचे दर 86.09 रुपये प्रति लिटर इतके होते. आज हाच दर 89.30 रुपये झाला आहे. त्यामुळे गेल्या 15 दिवसात पेट्रोलच्या दरात 3 रुपये 21 पैशांची वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या शहरातील पेट्रोलचे दर
मुंबई पेट्रोल- 89.30 रुपये डिझेल- 78.24 रुपये
औरंगाबाद पेट्रोल 90.34 रुपये डिझेल 79.32 रुपये
पुणे पेट्रोल - 90.03 रुपये डिझेल- 77.80 रुपये
गोंदिया पेट्रोल - 90.35 रुपये डिझेल- 78.11 रुपये
परभणी पेट्रोल - 91.07 रुपये डिझेल - 78.78 रुपये
अमरावती पेट्रोल - 90.54 रुपये डिझेल - 79.55 रुपये
नांदेड पेट्रोल- 90.87 रुपये डिझेल- 78.60 रुपये
मनमाड पेट्रोल- 90.40 रुपये डिझेल- 78.14 रुपये
सोलापूर पेट्रोल- 90.34 रुपये डिझेल- 78.88 रुपये
संबंधित बातम्या पेट्रोलची टिच्चून आगेकूच, शतकापासून 12 रुपये दूर! पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच, अमरावती, सोलापुरात महाग पेट्रोल इंधन दरवाढीचा फटका, भाजीपाला दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ स्पेशल रिपोर्ट @830 | पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला, 'अच्छे दिन'चं स्वप्न हवेतच डिझेलच्या दरात विक्रमी वाढ, पेट्रोलही महागलं