एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारताचे चौदावे राष्ट्रपती कोण? निकाल अवघ्या काही तासांवर
भारताचे चौदावे राष्ट्रपती कोण होणार, याची उत्सुकता देशवासियांना लागली आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल स्पष्ट होईल.
नवी दिल्ली : रामनाथ कोविंद की मीरा कुमार, भारताचे चौदावे राष्ट्रपती कोण होणार, याची उत्सुकता देशवासियांना लागली आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल स्पष्ट होईल.
निवडणूक अधिकारी आणि लोकसभेचे महासचिव अनुप मिश्रा यांच्या माहितीनुसार, "सकाळी 11 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सर्वात आधी संसद भवनातील बॅलेट बॉक्स उघडला जाईल आणि त्यानंतर सर्व 32 राज्यांचे बॅलेट बॉक्स उघडले जातील. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार बॅलेट बॉक्स उघडून, मतांची मोजणी केली जाईल. एकूण आठ टप्प्यात मतमोजणी होईल. यानंतर निवडणूक आयोगाचे रिटर्निंग ऑफिसर निकालाची अधिकृत घोषणा करतील."
राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात लढत आहे. राष्ट्रपतीपदासाठी 17 जुलै रोजी मतदान झालं होतं. संसदेच्या हॉल क्रमांक 62 मध्ये मतमोजणी होईल. इथेच 17 जुलै रोजी मतदान पार पडलं होतं.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी देशातील विविध राज्यांचे 4120 आमदार आणि 776 खासदारांना मतदानाचा अधिकार होता. यापैकी सुमारे 99 टक्के लोकप्रतिनिधींनी आपल्या मताधिकाराचा वापर केला.
776 खासदार आणि 4 हजार 120 आमदारांच्या एकूण मतांचं मूल्य 10 लाख 98 हजार 882 इतकं आहे आणि विजयासाठी कोविंद यांना फक्त 5 लाख 49 हजार 442 मतं गरजेची आहेत.
उत्तर प्रदेश, त्रिपुरा आणि महाराष्ट्रातील अनेक आमदार, खासदारांनी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान केलं. त्रिपुरातील तृणमूल काँग्रेसच्या गटानेही ममता बॅनर्जींचा आदेश डावलून थेट कोविंद यांच्या बाजूने आपलं मत टाकलं. त्यामुळे आता विक्रमी मतदानासह कोविंद जिंकतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. तर नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलै रोजी पदभार स्वीकारतील.
कोण आहेत रामनाथ कोविंद?
- रामनाथ कोविंद यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1945 उत्तरप्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील परौख गावी जन्म.
- कानपूर विद्यापीठातून एलएलबीपर्यंतच शिक्षण
- 1977 ते 1979 मध्ये दिल्लीच्या हायकोर्टात वकिली.
- 1994 आणि 2000 साली उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर नियुक्ती
- भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम पाहिलं
- भाजप दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष
- 8 ऑगस्ट 2015 पासून बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत
- मीरा कुमार 1973 मध्ये भारतीय विदेश सेवेत रुजू
- माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या कन्या.
- 1985 मध्ये राजकीय कारकीर्द सुरु, लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा खासदारपदी
- 1990 मध्ये काँग्रेसच्या कार्यकारणी समिती सदस्य होत्या
- 1996 आणि 1998 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत विजयी
- 2004 च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सामाजिक न्याय मंत्री पदाची सुत्रे
- 2009 मध्ये लोकसभा अध्यक्षा. देशाच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement