एक्स्प्लोर
Advertisement
काँग्रेसच्या होर्डिंगवर प्रणव मुखर्जींचा फोटो, राष्ट्रपती कार्यालयाचा आक्षेप
चंदीगड : पंजाबमध्ये काँग्रेसच्या होर्डिंग्सवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा फोटो झळकल्याने राष्ट्रपती भवनने मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवत यावर आक्षेप घेतला आहे. राष्ट्रपती कार्यालयाच्या निष्पक्षतेची खात्री करण्याची मागणी या पत्रामध्ये करण्यात आली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त नसिम जैदी यांना राष्ट्रपती कार्यालयाच्या सचिव ओमिता पॉल यांनी पत्र पाठवलं आहे. काही जाहिरातींमध्ये आणि होर्डिंग्सवर राष्ट्रपतींचा फोटो आढळून आल्याचं या पत्रात म्हटलं आहे. हे प्रकरण निवडणूक आयोगाच्या अखत्यारित येत असून लुधियानाचे निवडणूक उपायुक्त या प्रकरणाचा तपास करत आहेत.
राष्ट्रपतींचं पद हे पक्षीय राजकारणापेक्षा वेगळं आहे. त्यामुळे त्यांचा फोटो किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वस्तूचा वापर राजकीय हेतूसाठी केला जाऊ शकत नाही, असं पत्रात म्हटलं आहे.
कोणताच पक्ष राष्ट्रपतींच्या फोटोचा प्रचारासाठी वापर करु शकत नाही. त्यामुळे राष्ट्रपती कार्यालयाची निष्पक्षता अबाधित राहण्यासाठी निवडणूक आयोगाने संबंधित प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करावी, असं ओमिता पॉल यांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement