एक्स्प्लोर
विहिंपचे नेते प्रवीण तोगडियांच्या भावासह तिघांची हत्या
सुरत : विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडियांच्या भावासह तिघांची काल हत्या करण्यात आली आहे. भरत तोगडिया असं प्रवीण तोगडियांच्या भावाचं नाव आहे.
सुरतमध्ये काल रात्री आठच्या सुमारास भारत यांच्यासह आणखी दोघांची हत्या झाली असून, या तिघांचा मृतदेह भरत तोगडियांच्या मित्राच्या कार्यालयाच्या परिसरातच मिळाला.
भरत तोगडियांच्या मित्राला म्हणजेच बालू हिरानीला मारायला आलेल्या मारेकऱ्यांनी तिथं असलेल्या तिघांनाही मारलं असल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
भरत तोगडिया यांच्या हत्येमागे राजकीय कट नाही, असे सध्यातरी पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement