एक्स्प्लोर
ब्लॉग : शांतता, गोंधळ चालू आहे!

नवी दिल्ली : एखाद्या बड्या लढतीची मोठी जाहिरात व्हावी, सगळं क्रिकेट स्टेडियम सज्ज असावं, दोन्ही बाजूच्या कर्णधारांनी एकमेकांना शाब्दिक हल्ले करुन युद्धाची खुमखुमी दाखवलीय. उत्कंठा शिगेला पोहचावी आणि प्रत्यक्षात ती मॅचच कुठल्या कारणानं रद्द व्हावी. संसदेच्या हिवाळी अधिवेशनानं किती निराशा केलीय ते समजावं म्हणून हे उदाहरण. बाकी क्रिकेटच्या मॅचमध्ये सामना रद्द व्हायची कारणं निसर्गनिर्मित असतात. इथे तर चक्क अखिलाडूवृत्ती दोन्ही बाजूंची. शिवाय दोन्ही बाजूंना सामना होऊच नये यासाठी मॅचफिक्सिंग झालंय की काय इतकी शंका येण्यापर्यंत परिस्थिती. नोटाबंदीसारखा निर्णय हा शतकातून एकदा होत असतो. फार कमी सरकारी निर्णय असे असतात ते लोकांच्या जीवनशैलीवर एवढा प्रभाव टाकू शकतात. गेले महिनाभर नाक्यानाक्यांवर, पान टपरीवर, दिवाणखान्यात, कार्यालयांमध्ये सगळीकडे फक्त याच नोटाबंदीची चर्चा आहे. बरी वाईट जे काही. पण देशाच्या सर्वोच्च सभागृहात मात्र त्यावर चर्चा होऊ शकली नाही. 16 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर फक्त गोंधळ आणि गोंधळच पाहायला मिळाला. House is adjourned till…दिवसातून किमान तीन चार वेळा एवढेच नीट कानावर यायचे. राहुल गांधी नेमका कुठला भूकंप घडवणार होते ते राहिलंच, असा कुठला देश आहे जिथे लोकांना त्यांचेच हक्कांचे पैसे काढण्यावर निर्बंध आहेत, या मनमोहन सिंहांच्या टोकदार प्रश्नाचं उत्तरही राहिलं, अर्थमंत्र्यांनाही निर्णयाची माहिती नव्हती, असे टोले लगावणाऱ्या विरोधकांना जेटलींनी आपल्या भाषणात काय उत्तर दिलं असतं, तेही राहिलं. आणि नोटबंदीनंतर भावनिक वक्तव्यांचे उत्तम परफॉर्मन्स पेश करणाऱ्या पंतप्रधानांनी सभागृहातही इमोशनल अत्याचार केला असता का, या प्रश्नाचंही उत्तर राहिलं. अशा अनेक अर्थांनी हे अधिवेशन अनुत्तरित राहिलं. गोंधळ सगळीकडे चालू आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत, जनतेच्या मनात आणि खासदारांच्या वर्तनातही तो कायम राहिला. कामकाजाच्या दृष्टीनं हे अधिवेशन गेल्या 15 वर्षातलं सर्वात खराब कामगिरीचं अधिवेशन ठरलंय. पण तरीदेखील या गोंधळाभोवती, गोंधळापाठीमागे जे राजकारण सुरु होतं त्यावरुन या अधिवेशनाची काही ठळक वैशिष्ट्ये मात्र सांगता येतील. त्याची जरा क्रमवार चर्चा करुयात.
- रिटर्न ऑफ मनमोहन सिंह-
- राहुल गांधी फ्रंटफुटवर-
- आम्हाला बोलू दिलं जात नाही-
- सत्ताधारीही गोंधळात आघाडीवर-
- पितामह भीष्म, द्रोणाचार्य केवळ हतबल-
- पुन्हा मोदी विरुद्ध सगळे-
- संसदेला डावलूनच काम होत राहणार ? -
- मोदींना सभागृहात बोलायला इंटरेस्ट नाही का?-
- संसदेला शिस्त लावण्यासाठी काय करता येईल?-
- हिवाळी अधिवेशन आकडेवारीत- गेल्या 15 वर्षातलं सर्वात खराब कामगिरी करणारं हे अधिवेशन ठरलंय. आयकर दुरुस्ती विधेयक, दिव्यांग हक्क विधेयक ही दोनच विधेयकं या संपूर्ण अधिवेशनात मंजूर होऊ शकलीयेत. लोकसभेचे 107 तर राज्यसभेचे 101 तास गोंधळात वाया गेलेत. या अधिवेशनाअखेर एकूण प्रलंबित विधेयकांची संख्या आता 60 वर पोहचलीये. राज्यसभेत 330 प्रश्न हे प्रश्नकाळासाठी पटलावर होते. त्यातल्या केवळ दोनच प्रश्नांची उत्तरं मिळालीयेत. लोकसभेतही प्रश्नकाळ केवळ 11 टक्केच यशस्वी ठरलाय.
आणखी वाचा























