एक्स्प्लोर
प्रद्युम्नचं दप्तर माझ्यासाठी कवच बनलं, आरोपी विद्यार्थ्याची कबुली
आरोपी विद्यार्थी प्रद्युम्नला ओळखत होता, त्यामुळे कोणाच्याही मदतीशिवाय तो त्याला सहजरित्या वॉशरुममध्ये घेऊन गेला आणि त्याचा गळा चिरला.
गुरुग्राम : हरियाणातील गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न हत्याकांडात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. परीक्षा आणि पालक-शिक्षक मीटिंग टाळण्यासाठी अकरावीच्या विद्यार्थ्याने प्रद्युम्नची गळा चिरुन हत्या केल्याचं सीबीआय तपासात समोर आलं. महत्त्वाचं म्हणजे प्रद्युम्न आणि आरोपी विद्यार्थी एकमेकांना चांगले ओळखत होते. तसंच आरोपी विद्यार्थ्याने प्रद्युम्नला फसवून वॉशरुममध्ये नेलं आणि तिथे त्याची हत्या केली.
पियानो क्लासमुळे प्रद्युम्न-आरोपीची ओळख
प्रद्युम्न आणि आरोपी विद्यार्थी पियानो क्लासमध्ये एकत्र शिकत होते. त्यामुळेच ते दोघे एकमेकांना ओळखत होते. प्रद्युम्न दोन वर्षांपासून पियानो क्लासला जात होता, असं त्याच्या पालकांनीही सांगितलं होतं.
काऊन्सलिंगदरम्यान शनिवारी आरोपी विद्यार्थ्याने बालन्यायालयासमोर सांगितलं की, "8 सप्टेंबरला सकाळी शाळेत पोहोचल्यानंतर मी दप्तर वर्गात ठेवलं आणि सोहना मार्केटमधून खरेदी केलेला चाकू घेऊन तळमजल्यावर आलो. वॉशरुममध्ये प्रद्युम्नचा गळा चिरल्यानंतर त्याने रक्ताची उलटी केली आणि चाकूवर पडला. यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली."
प्रद्युम्नचं दप्तर कवच बनलं!
आरोपी विद्यार्थी प्रद्युम्नला ओळखत होता, त्यामुळे कोणाच्याही मदतीशिवाय तो त्याला सहजरित्या वॉशरुममध्ये घेऊन गेला आणि त्याचा गळा चिरला. सीबीआयनुसार आरोपीने सांगितलं की, "प्रद्युम्नच्या पाठीवर दप्तर होतं, जे माझ्यासाठी कवच बनलं. दप्तरामुळे माझ्या कपड्यांवर रक्ताचे डाग किंवा शिंतोडे उडाले नाहीत. यानतंर चाकू वॉशरुममध्येच सोडून बाहेर पडलो आणि माळी तसंच शिक्षकांना याची माहिती दिली."
परीक्षा टाळण्यासाठी हत्या
याशिवाय आरोपी विद्यार्थ्याला परीक्षेची भीती वाटत होती. कोणत्याही परिस्थितीत त्याला परीक्षा टाळायची होती, अशी कबुलीही आरोपीने बालन्यायालयासमोर दिल्याचं सीबीआयने सांगितलं.
आरोपीची बालसुधारगृहात रवानगी
तीन दिवसांची कोठडी संपल्यानंतर सीबीआयने शनिवारी आरोपी विद्यार्थ्याला बाल न्यायालयाचे दंडाधिकारी देवेंद्र सिंह यांच्यासमोर हजर केलं. सीबीआयने कोठडी वाढवण्याची मागणी न केल्याने आरोपी विद्यार्थ्याची रवानगी 22 नोव्हेंबरपर्यंत फरीदाबादच्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
पालकांच्या भांडणामुळे अभ्यासात लक्ष नाही!
कोर्टात सादर केलेल्या अहवालात सीबीआने नमूद केलं आहे की, "वॉशरुममध्ये प्रद्युम्नची हत्या केल्याचं आरोपीने कबूल केलं आहे. "आई-वडिलांमधील दररोजच्या भांडणामुळे घरचं वातावरण अतिशय खराब झाल्याने आपलं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं," असं विद्यार्थ्याने सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. "आता जिल्हा बाल संरक्षण केंद्र आरोपीच्या पालकांशी, शेजारी आणि मित्र परिवाराशी बातचीत करुन त्याचा अहवाल तयार करेल. हा अहवाल या प्रकरणात महत्त्वाची भूमिका निभावेल," असंही सूत्रांनी म्हटलं आहे.
शाळेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय आहे?
दुसरीकडे सीबीआयला शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या दोन फुटेजमधून आरोपी विद्यार्थ्याविरोधात महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. या दोन फुटेजमध्ये काय आहे, हे पाहूया.
सकाळी 7.41 वाजचा : कंडक्टर अशोक कुमारने मुलांना बसमधून उतरवलं.
सकाळी 7.48 वाजता : सर्व मुलं बसमधून उतरतात.
सकाळी 7.51 वाजता : प्रद्युम्न वॉशरुममध्ये जातो.
सकाळी 7.58 वाजता : प्रद्युम्न वॉशरुममधून बाहेर येतो.
सकाळी 7.59 वाजता : प्रद्युम्न आणि त्याच्या मागे आरोपी विद्यार्थी वॉशरुममध्ये जाताना दिसतो.
सकाळी 8.00 वाजता : 5 किंवा 6 मिनिटांनी आरोपी विद्यार्थी बाहेर येताना दिसतो.
यानंतर लगेचच काही मुलं टॉकमांडोचे कपडे बदलण्यासाठी आत जातात.
यानंतर आरोपी विद्यार्थी प्रद्युम्नबाबत काहीतरी सांगताना दिसत आहे.
सकाळी 8.09 वाजता : पुन्हा काही मुलं वॉशरुमजवळ जाताना दिसत आहेत.
सकाळी 8.11-8.13 वाजता : जखमी अवस्थेत प्रद्युम्नला शाळेतून रुग्णालयात घेऊन जातात.
शिक्षकांच्या फोन रेकॉर्डचीही चौकशी होणार
जबाबातील विरोधाभास जाणवल्यानंतर, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर सीबीआयने प्रद्युम्नची हत्या करणाऱ्या आरोपी विद्यार्थ्याचा शोध लावला. सीबीआयने दिल्लीबाहेर असलेल्या एफएसएलमध्ये या सीसीटीव्ही फुटेजचं वैज्ञानिक विश्लेषण केलं आहे. तसंच सीबीआने रायन स्कूलच्या दोन शिक्षकांच्या फोन रेकॉर्डचीही चौकशी केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
गुन्हा वदवून घेण्यासाठी पोलिसांचा कंडक्टरवर दबाव
गुरुग्राम पोलिसांनी जाणीवपूर्वक अनेक पुराव्यांकडे दुर्लक्ष करुन ते नष्ट करण्याचे प्रयत्न केले होते. यानंतर बस कंडक्टरला दोषी ठरवण्यासाठी पुरावे तयार करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कॉल रेकॉर्डचा तपास सुरु आहे, असं सीबीआयच्या तपासात समोर आलं आहे.
याआधी हरियाणा पोलिसांनी बस कंडक्टर अशोक कुमारकडून गुन्हा वदवून घेण्यासाठी दबाव टाकला होता. तसंच कोऱ्या कागदावर त्याची स्वाक्षरीही घेतली होती. दबावात येऊन त्याने मीडियासमोर प्रद्युम्नच्या हत्या केल्याची कबुली दिली होती. यानंतर अनेक पोलिस कर्मचाऱ्यांवर संशय बळावला होता.
काय आहे प्रकरण?
8 सप्टेंबर रोजी गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या वॉशरुममध्ये प्रद्युम्न ठाकूरची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. दुसरीत शिकणाऱ्या सात वर्षीय विद्यार्थी प्रद्युम्न ठाकूरसोबत दुष्कृत्यचा प्रयत्न केल्यानंतर हत्या केली होती.
याप्रकरणी स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमारसह तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी अशोक कुमारने हत्या केल्याची कबुली दिली होती. पण नंतर कोर्टात त्याने जबाब फिरवला. दबावात येऊन मी हत्या केल्याची कबुली दिली होती, असं अशोक कुमारने सांगितलं.
“माझ्या मुलाच्या हत्येमागे आणखी कोणाचातरी हात असू शकतो,” असा संशय प्रद्युम्नच्या आई-वडिलांनी व्यक्त केला होता.
यानतंर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी 15 सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.
संबंधित बातम्या
परीक्षा आणि पालक-शिक्षक मीटिंग टाळण्यासाठी प्रद्युम्नची हत्या : सीबीआय
प्रद्युम्न हत्याकांड : चौकशीसाठी तीनजण सीबीआयच्या ताब्यात
प्रद्युम्न हत्या : शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर
प्रद्युम्न हत्या : वडिलांची याचिका, सुप्रीम कोर्टाची हरियाणा सरकार, शाळेला नोटीसलैंगिक शोषणानंतर 7 वर्षांच्या मुलाची गळा चिरुन हत्या, बस कंडक्टर अटकेत
प्रद्युम्न हत्या : वडिलांची याचिका, सुप्रीम कोर्टाची हरियाणा सरकार, शाळेला नोटीस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement