एक्स्प्लोर
Advertisement
6 वर्षांनंतर भारतात पुन्हा पोलिओचा व्हायरस सापडला!
हैदराबाद : हैदराबादमध्ये काही दिवसांपूर्वी गटाराच्या पाण्यातून पोलिओचा व्हायरस सापडला आहे. त्यामुळे हादरलेल्या तेलंगणा सरकारने याविरोधात एक विशेष मोहीम हाती घेतली आहे.
या व्हायरसचं नाव व्हीडीपीव्ही टाईप-2 आहे. गटाराच्या पाण्याची चाचणी केल्यानंतर या व्हायरसचा खुलासा झाला आहे.
महत्त्वाचं म्हणजे देशात 2010 नंतर पोलिओचा एकही व्हायरस आढळला नव्हता. मात्र आता चाचणीत व्हायरस सापडल्याने तेलंगणा सरकार चिंतातूर झालं आहे.
तेलंगणाच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव राजेश्वर तिवारी यांनी सांगितलं की, "आम्ही हैदराबाद आणि रंगा रेड्डी जिल्ह्यात 20 ते 26 जून या काळात एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. यादरम्यान सहा आठवड्यांपासून 3 वर्षांपर्यंतच्या बाळांची तपासणी केली जाईल."
2011 मध्ये देशातून पोलियोचं पूर्णत: उच्चाटन झाल्यानंतर अनेक ठिकाणी देखरेख म्हणून तपासणी करण्यात आली होती. त्याचवेळी या व्हायरसचा शोध लागला. 17 मे रोजी नियमित तपासणीदरम्यान गटाराच्या पाण्यात व्हायरस आढळला. हैदराबादच्या विविध भागातून 30 नमुने घेण्यात आले होते.
हा व्हायरस आढळण्याची ही पहिली वेळ नाही. बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतही हा व्हायरस सापडला होता.
पोलिओशी संबंधित महत्त्वाच्या बाबी
- पोलिओ हा संक्रमणाने होणारा आजार आहे, जो सामान्यत: लहान मुलांमध्ये आढळतो. यावर उपचार नाहीच. त्यामुळे बाळ जन्मल्यानंतर त्यांना पोलिओ डोस देऊन या आजारापासून बचाव करता येतो.
- पोलिओ कणा आणि मॅडुलाचा आजार आहे. पोलियो स्नायू किंवा हाडांचा आजार नाही.
- लहान मुलांमध्ये पोलिओ व्हायरसविरोधात लढण्यासाठी प्रतिकारशक्ती नसते. त्यामुळे हा आजार लहान मुलांना होण्याचा धोका सर्वाधिक असतो.
- पोलिओपासून वाचण्यासाठी मुलांना ओरल वॅक्सिन दिली जाते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
सोलापूर
क्रिकेट
पुणे
Advertisement