एक्स्प्लोर
अँटीगुआचा झटका, मेहुल चोकसीला भारतात पाठवण्यास नकार
घोटाळ्यानंतर तो देश सोडून फरार झाला आहे. मेहुल चोकसी अमेरिकेतून अँटीगुआमध्ये पोहोचला होता. इथे त्याला याच देशाची नागरिकता मिळाली.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतून साडे तेरा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात आरोपी मेहुल चोकसीला भारतात परत आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे. मेहुल चोकसीला अटक करुन भारतात पाठवण्यास अँटीगुआ सरकारने नकार दिला आहे. अँटीगुआ सरकारच्या मते, "आमचा भारतासोबत कोणताही प्रत्यार्पण करार झालेला नाही. नियमानुसार मेहुल चोकसीला नागरिकता देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचं पासपोर्ट रद्द होऊ शकत नाही. शिवाय त्याला परत भारतात पाठवू शकत नाही. देशाचं संविधान चोकसीच्या सुरक्षा करतं." बनावट एलओयूद्वारे पीएनबी बँकत घोटाळ्याचा आरोपी मेहुल चोकसी हा गीतांजली जेम्स कंपनीचा मालक आहे. घोटाळ्यानंतर तो देश सोडून फरार झाला आहे. मेहुल चोकसी अमेरिकेतून अँटीगुआमध्ये पोहोचला होता. इथे त्याला याच देशाची नागरिकता मिळाली. त्याने सिटीझनशिप फॉर इन्व्हेस्टमेंट उपक्रमाअंतर्गत तिथे शरण घेतली होती. या उपक्रमानुसार, कोणीतीही व्यक्ती 1.3 कोटी रुपये देऊन अँटीगुआची नागरिकता मिळवू शकतो. त्याला नोव्हेंबर 2017 मध्ये अँटीगुआचं नागरिकत्व मिळवं होतं. तर यंदा 15 जानेवारीला चोकसीने अँटीगुवाचा नागरिक म्हणून शपथ घेतली होती. मेहुल चोकसी आता अँटीगुआचा नागरिक असल्याचं समजल्यानंतर भारत सरकारने अँटीगुवा सरकारशी संपर्क करुन त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. तो फरार हीरे व्यावसायिक मेहुल चोकसीला अटक करा, त्याचा पासपोर्ट रद्द करा आणि भारतात परत पाठवा. तसंच जमीन, हवाई आणि जल मार्गाच्या प्रवासावर बंदी घालावी, असं आवाहन भारत सरकारने केलं होतं. मात्र अँटीगुवा सरकारने या सगळ्या मागण्या फेटाळल्या.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























