एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांचा खर्च तब्बल...

मोदींच्या परदेश दौऱ्यांचा खर्च 2021 कोटींहून अधिक आहे. तर मनमोहन सिंह यांच्या काळात हा खर्च 1346 कोटी रुपये होता.

नवी दिल्ली : 2021 कोटी रुपये... हा आकडा कुठल्या कल्याणकारी योजनेवर झालेल्या खर्चाचा नाही... तर हा आहे पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर झालेल्या खर्चाचा सरकारी आकडा. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयानेच ही आकडेवारी दिली आहे. चार्टर्ड विमान प्रवास भाडं, विमानाचा देखभाल खर्च आणि हॉटलाईन फोन सुविधा या तीन बाबींअंतर्गतचा खर्च यात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यातही हॉटलाईन फोनच्या बिलाचे आकडे हे दोन वर्ष आधीचे आहेत. मोदींच्या तुलनेत मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात मात्र परदेश दौऱ्यांसाठी सरकारी तिजोरीवर कमी भार पडल्याचं चित्र दिसतं. सत्तेत आल्यापासून आतापर्यंत मोदींनी 48 परदेश दौऱ्यांमधे 55 देशांना भेटी दिल्या, तर 2009 ते 2014 या यूपीए 2 च्या काळात मनमोहन सिंह यांनी 38 परदेश दौऱ्यांमधे 33 देशांना भेटी दिल्या होत्या. मोदींच्या परदेश दौऱ्यांचा खर्च 2021 कोटींहून अधिक आहे. तर मनमोहन सिंह यांच्या काळात हा खर्च 1346 कोटी रुपये होता. म्हणजे मोदींच्या कार्यकाळात परदेश दौऱ्यांवर झालेला खर्च मागच्या सरकारच्या तुलनेत 800 कोटींनी अधिक आहे. काँग्रेस खासदार संजय सिंह यांनी संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी ही माहिती दिली. ज्या ज्या देशांना मोदींनी भेटी दिल्यात, तिथून भारतात नेमकी किती गुंतवणूक आली हे या खासदारांना जाणून घ्यायचं होतं. अर्थात पंतप्रधानांची भेट आणि आलेली गुंतवणूक यांचा थेट संबंध काढणं तितकंसं बरोबर नाही, कारण त्यात इतरही घटक कारणीभूत असतात. 2014 नंतर ज्या देशांना मोदींनी भेट दिली, त्यातल्या अनेक देशांतून सर्वाधिक परकीय गुंतवणूक आल्याचं सरकारनं या उत्तरात म्हटलं आहे. संजय सिंह यांचा दुसरा प्रश्न होता, या प्रत्येक दौऱ्यात किती सरकारी-बिगरसरकारी व्यक्ती पंतप्रधानांच्या सोबत होत्या, त्यांच्यावर झालेल्या खर्चाचा तपशील द्या. मनमोहन सिंह आणि मोदी या दोघांच्या कार्यकाळातली ही तुलनात्मक माहिती प्रश्नात विचारण्यात आली होती. पण या प्रश्नाचं उत्तर सरकारनं टाळलं. ही माहिती संवेदनशील असल्यानं ती जाहीर करता येत नाही असं उत्तरात म्हटलं आहे. सत्तेत आल्यापासून मोदींचे परदेश दौरे हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेले आहेत. जगाची विभागणी मोदींनी भेट दिलेले देश आणि न भेट दिलेले देश अशीही काहींनी करुन टाकलीय. या परदेश दौऱ्यांमधून काही ठोस हाती लागलं, का याचं उत्तर भविष्यात मिळेलच. आपण आपले सगळे शेजारी राष्ट्र आपण दुखावून ठेवलेत. पाकिस्तानची गळाभेट घेऊन संबंध सुधारतील या आशेनं कधी नव्हे इतकं गोंधळाचं धोरण राबवलं गेलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे निवडणूक वर्षातल्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे येणार होते, पण त्यांनीही नकार कळवला. आता निवडणूक वर्षात मोदींनी आपल्या परेदश दौऱ्यांना पूर्ण ब्रेक दिला आहे. पुढच्या चार महिन्यांत ते एकही परदेश दौरा न करता निवडणूकीवरच लक्ष केंद्रित करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Keshav Upadhye on Sonia Gandhi: बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
एकदाच मोबाईल चार्ज करा, निवांत राहा, 'ही' कंपनी करणार जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च, नेमका किती असणार बॅटरी बॅकअप
एकदाच मोबाईल चार्ज करा, निवांत राहा, 'ही' कंपनी करणार जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च, नेमका किती असणार बॅटरी बॅकअप
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
Old Monk Rum Latest Marathi News: 5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती

व्हिडीओ

Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
Ravindra Dhangekar: महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
अजित दादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं; अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं
अजित दादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं; अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं
Sunetra Pawar : 'जशी वेळ येईल तशा गोष्टी....', भेटीगाठी अन् राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?
'जशी वेळ येईल तशा गोष्टी....', भेटीगाठी अन् राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?
Keshav Upadhye on Sonia Gandhi: बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
Hardik Pandya Mumbai Indians: बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
NCP MLA and Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
Embed widget