PM Modi Interview: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीतील महत्त्वाचे सात मुद्दे....
PM Modi Interview: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी देशातील विविध मुद्द्यावर चर्चा केली.
नवी दिल्ली: काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष असून त्यामुळे देशातील लोकशाहीला मोठा धोका असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला एक विशेष मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधानांच्या मुलाखतीतील महत्त्वाचे सात मुद्दे
सर्व राज्यात भाजप निवडूण येणार
पाच राज्यांमध्ये भाजपचाच विजय होणार असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. आगामी निवडणुकीत आम्हाला पाच राज्यांत सेवा करण्याची संधी मिळेल. निवडणुकीच्या निमित्तानं सर्व राज्यांना पाहतोय. सर्व राज्यात मला भाजपाची लाट आहे. भाजप प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकेल असं ते म्हणाले.
मी पंतप्रधानांवर टीका केली होती, कोणाच्या आजोबांवर नाही
मी कोणाचेही वडील, आजोबा किंवा आईबाबत बोललेलो नाही. मी देशाच्या पंतप्रधानांबाबत बोललो होतो असा पलटवार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींच्यावर केला. त्यावेळच्या पंतप्रधानांचे काय विचार होते आणि आताच्या पंतप्रधानांचे काय विचार आहेत हे मी सांगितलं असं मोदी म्हणाले.
घराणेशाही हा लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू
काँग्रेस घराणेशाहीचा पक्ष असून त्या पक्षात फक्त घराणेशाहीच चालते. ही घराणेशाही लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू आहे.
राहुल गांधींवर टीका
राहुल गांधी हे कुणाचं ऐकत नाहीत आणि ते संसदेत बसत नाहीत अशी टीका पंतप्रधानांनी त्यांच्यावर केली.
गेल्या 50 वर्षात कॉंग्रेसने देशाच्या विभाजनाचे काम केले
गेल्या 50 वर्षांमध्ये काँग्रेसने देशाच्या विभाजनाचं काम केलं आहे अशी टीका पंतप्रधानांनी काँग्रेसवर केली आहे.
भाजप पंजाबमध्ये सर्वाधिक विश्वसनीय पक्ष
भाजप हाच पंजाबमधील सर्वाधिक विश्वसनीय पक्ष असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी जे काम केलंय त्यामुळे पंजाबमध्ये आम्हाला बहुमत मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
लखीमपूर खेरी घटनेवर समिती
लखीमपूर खेरीमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याची घटना घडली होती. त्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती बसवली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
संबंधित बातम्या: