सोशल मीडियावर मोदींचे फॉलोअर्स कोटींच्या घरात; 2019मधील 'ते' ट्वीट 'गोल्डन ट्वीट'
सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांची लोकप्रियतेने रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. ट्विटरवरील सर्वात चर्चेत असणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे, नरेंद्र मोदी. ट्विटर इंडियाच्या रिपोर्टनुसार, 2018मध्ये करण्यात आलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीट सर्वाधिक चर्चेत राहिलेलं ट्वीट होतं.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोडण्याचा विचार करत आहेत. त्यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, 'मी या येत्या रविवारी माझ्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि युट्यूब या सर्व सोशल मीडियावरून निघून जाण्याचा विचार करत आहे, तुम्हाला याबद्दल माहिती देत राहीन' मोदींच्या या ट्वीटवरून संपूर्ण जगभरात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच मोदी रविवारी कोणती माहिती देणार याबाबतही तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या अकाउंटवर सर्वाधिक फॉलो करण्यात येणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहेत.
वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदींचे एवढे फॉलोअर्स
ट्विटरवर पंतप्रधान मोदी यांचे 5 कोटी 33 लाख आणि फेसबुकवर 4 कोटी 45 लाख फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 3 कोटी 52 लाखा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर 3 अकाउंट आहेत. @pmoindia, @narendramodi ,@narendramodi_in तिन्ही अकाउंट्सचे मिळून जवळपास 8.7 कोटी फॉलोअर्स आहेत.
पाहा व्हिडीओ : PM Narendra Modi Tweet | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सोशल मीडिया सोडण्याचे संकेत
2009 पासून ट्विटरवर सक्रिय आहे मोदी
पंतप्रधान मोदी यांचं ट्विटर अकाउंट जानेवारी 2009मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. 2009 साली मोदींनी ट्विटरवर आगमन केलं, गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांचे ट्वीट तुलनेनं फार कमी असायचे आणि पहिल्या दोन वर्षात तर फक्त नावालाच ते ट्विटर होते असं चित्र होतं. नरेंद्र मोदी 2009 साली दिवसाला 0.62 आणि 2010 साली तर फक्त 0.23 ट्वीट करायचे. मात्र 2011 नंतर त्यांच्या ट्वीट्सची संख्या वाढत गेली. 2011 साली दिवसाला 1.17, 2012 साली 3.28 आणि 2013 मध्ये 4.19 ट्वीट त्यांच्या अकाऊंटवरून केले गेले. ट्विटरवर त्यांच्या 5.30 कोटी फॉलोअर्स आहेत. सर्वांनाच माहित आहे की, मोदी ट्विटरवर सक्रिय असतात. एवढचं नाहीतर पंतप्रधानांचे ट्वीट नेहमी चर्चेतही असतात.
सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांची लोकप्रियतेने रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. ट्विटरवरील सर्वात चर्चेत असणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे, नरेंद्र मोदी. ट्विटर इंडियाच्या रिपोर्टनुसार, 2018मध्ये करण्यात आलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीट सर्वाधिक चर्चेत राहिलेलं ट्वीट होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या ट्वीटवर विरोधकांची खोचक टीका
2019मध्ये मोदींचं ट्वीट भारताचं 'गोल्डन ट्वीट'
लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला एकहाती सत्ता मिळाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्वीट केलं होतं. पंतप्रधानांचं ते ट्वीट 2019मधील सर्वाधिक वेळा रिट्वीट आणि लाईक करण्यात आलेलं ट्वीट होतं. हे ट्वीट भारताचं 'गोल्डन ट्वीट' निवडण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या :
नरेंद्र मोदींचे सोशल मीडिया सोडण्याचे संकेत, येत्या रविवारी मोठा निर्णय घेणारजाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्चर्यकारक निर्णय
मुख्यमंत्री ते पंतप्रधान... मोदींचा अकरा वर्षांचा ट्विटर प्रवास!