एक्स्प्लोर

'काही लोकांना येथे हार्वर्ड अभ्यासाची मोठी क्रेझ', राहुल गांधींवर पंतप्रधानांचा हल्लाबोल, भाषणातील दहा महत्वाचे मुद्दे

PM Narendra Modi : ईडीने सर्व विरोधकांना एकत्र आणले, त्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचे आभार. त्यांना निवडणुकीचे निकाल जमले नाहीत, विरोधी पक्षांवर हल्लाबोल करत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

PM Narendra Modi : ईडीने सर्व विरोधकांना एकत्र आणले, त्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचे आभार. त्यांना निवडणुकीचे निकाल जमले नाहीत, विरोधी पक्षांवर हल्लाबोल करत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या अभिभाषण प्रस्तावावर संबोधन करताना ते संसदेत बोलत होते. 

PM Narendra Modi : 'यूपीएच्या काळात देश सुरक्षित नव्हता'

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 2004 ते 2014 या काळात भारताची अर्थव्यवस्था ढासळली. महागाई दोन अंकी राहिली. म्हणूनच काही चांगले झाले तर त्यांना निराशा जास्त येते. ते म्हणाले, ''2004 ते 2014 हे स्वातंत्र्याच्या इतिहासातील घोटाळ्यांचे दशक आहे. यूपीएच्या याच 10 वर्षात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात दहशतवादी हल्ले होत राहिले. त्यांच्या काळात देश सुरक्षित नव्हता.''

प्रत्येकाने आपआपले आकडे मांडले, अर्थ मांडले आणि आपली रुची, प्रवृत्ती आणि प्रकृतीनुसार सर्वांनी आपलं म्हणणं मांडलं. त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकल्यानंतर हे लक्षात येतं की कोणाची किती क्षमता आहे, किती समज आहे, कुणाचा काय इरादा आहे हे सर्व समजतं.

पंतप्रधान म्हणाले की, त्या 10 वर्षांत भारताचा आवाज जागतिक व्यासपीठावर इतका कमकुवत होता की कोणीही ऐकायला तयार नव्हते. प्रत्येक संधीचे संकटात रूपांतर करणे ही यूपीएची ओळख बनली आहे. जेव्हा तंत्रज्ञानाचे युग खूप वेगाने वाढत होते, त्याच वेळी ते 2G मध्ये अडकून राहिले.  2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. सीडब्लूजी घोटाळ्याने संपूर्ण देश जगात बदनाम झाला.

PM Narendra Modi : '2008 मध्ये झालेला दहशतवादी हल्ला कोणीही विसरू शकत'

पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशावर इतके दहशतवादी हल्ले झाले. 2008 मध्ये झालेला दहशतवादी हल्ला कोणीही विसरू शकत नाही. 10 वर्षे देशभर रक्त वाहत होते. 2004 ते 2014 हे दशक The lost decade दशक म्हणून ओळखले जाईल. 2030 हे दशक संपूर्ण जगात भारताचे दशक आहे.

PM Narendra Modi : हार्वर्ड अभ्यासाबाबत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

पंतप्रधान  मोदी म्हणाले की, काही लोकांना येथे हार्वर्ड अभ्यासाची मोठी क्रेझ आहे. कोरोनामध्येही असेच म्हटले होते... हार्वर्डमध्ये भारताच्या वाईट परिस्थितीवर चर्चा होईल, असे काँग्रेसने म्हटले होते. काल पुन्हा हार्वर्ड अभ्यासाचं नाव घेतलं. गेल्या काही वर्षांत हार्वर्डमध्ये खूप चांगला अभ्यास केला गेला आहे, तो विषय आहे The Rise & Decline of India's Congress Party. मला खात्री आहे की भविष्यात काँग्रेसच्या वाईट परिस्थितीवर जगात अभ्यास होईल.

मला वाटलं होतं, राष्ट्रपतींच्या भाषणावर कोणी सदस्य काही नोंदी लिहून घेतले असतील, त्यावर आक्षेप उपस्थित करतील. पण कोणीही विरोधी खासदारांनी त्याला विरोध दर्शवला नाही. ते सर्व स्वीकारलं याचा मला आनंद आहे.

PM Narendra Modi : 'काही लोक आपल्या कुटुंबासाठी खूप काही उद्ध्वस्त करण्यास तयार आहेत'

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''काही लोक आपल्या कुटुंबासाठी खूप काही उद्ध्वस्त करण्यास तयार आहेत. काही लोक स्वतःसाठी, कुटुंबासाठी जगत असतात. मोदी 140 कोटी कुटुंबीयांचा सदस्य आहे, 140 कोटींचे आशीर्वाद मोदींसोबत आहेत.''

एक मोठा नेता राष्ट्रपतींचा अपमानही करतो, आदिवासी समाजाप्रती द्वेष दाखवतो, मात्र अशा गोष्टी टीव्हीसमोर बोलल्या गेल्या, ते म्हणजे त्यांच्या जे पोटात होतं ते ओठात आलं.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधी पक्षांनी लोकसभेत गदारोळ केला. अदानी प्रकरणात जेपीसीची मागणी करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Union Budget 2025: आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
Budget 2025 Income Tax Slab: मध्यमवर्गीयांना खुशखबर मिळणार, टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता, 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त?
मध्यमवर्गीयांना खुशखबर मिळणार, टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता, 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त?
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 at 7AM Superfast 01 February 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याMajha Goan Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 01  February 2024 : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 01 February 2025Top 100 News : टॉप शंभर बातम्यांचा आढावा : 01 February 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Union Budget 2025: आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
Budget 2025 Income Tax Slab: मध्यमवर्गीयांना खुशखबर मिळणार, टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता, 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त?
मध्यमवर्गीयांना खुशखबर मिळणार, टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता, 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त?
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
Embed widget