(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi : 'अनेक दशकांपासून रेल्वेला स्वार्थी राजकारणाचं बळी व्हावं लागलं' पंतप्रधानांकडून खंत व्यक्त, रेल्वे प्रकल्प उद्घाटन प्रसंगी आणखी काय म्हणाले?
PM Modi : पंतप्रधान म्हणाले की, मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ (Third Term) जूनपासून सुरू होत आहे. आतापासून ज्या गतीने काम सुरू आहे. ती सर्वांना चकित करणार आहे.
PM Modi : 'आज भारताने छोटी स्वप्ने पाहणे बंद केले आहे. आम्ही मोठी स्वप्ने पाहतो आणि ती पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस काम करतो. हा निर्धार या विकसित भारत, विकसित रेल्वे कार्यक्रमात दिसून येतो' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे देशभरातील 554 रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यावेळी ते बोलत होते. अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेंतर्गत रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, ओव्हर ब्रिज आणि अंडरपासचे उद्घाटन तसेच पायाभरणी करण्यात आली. मुंबईतील चर्नी रोड स्टेशन परिसरातील रेल्वेच्या कार्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
काय म्हणाले PM मोदी?
पंतप्रधान पुढे म्हणाले की, देशात वेगाने काम सुरू आहे. आज रेल्वेशी संबंधित दोन हजारांहून अधिक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन समारंभ एकाच वेळी झाला. सध्या मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ (Third Term) जूनपासून सुरू होत आहे. आतापासून ज्या गतीने काम सुरू आहे. ती सर्वांना चकित करणार आहे. ते म्हणाले की, अनेक दशकांपासून रेल्वेला स्वार्थी राजकारणाचे बळी व्हावे लागले. आज रेल्वे हा प्रवास सुलभतेचा एक भाग बनला आहे. आज रेल्वे मोठ्या बदलाच्या काळातून जात आहे.
तुमचे स्वप्न, तुमची मेहनत आणि मोदींचा संकल्प - पंतप्रधान
तुमचे स्वप्न, तुमची मेहनत आणि मोदींचा संकल्प हीच विकसित भारताची हमी असल्याचे पंतप्रधान म्हणाले. वंदे भारतसारख्या सेमी हायस्पीड ट्रेनचा विचार कोणत्याही सरकारने केलेला नाही. दशकभरापूर्वी याची कल्पना करणेही अवघड होते. दशकभरापूर्वीपर्यंत रेल्वेतील स्वच्छता स्थानकावर स्वच्छता ही मोठी गोष्ट मानली जात होती. आज हे सर्व दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे. विमानतळासारख्या आधुनिक सेवा फक्त श्रीमंतांसाठीच उपलब्ध आहेत. आज गरीबांना रेल्वेवर विमानतळासारख्या सुविधा मिळू शकतात.
गेल्या 10 वर्षात रेल्वेत अमूलाग्र बदल झाले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे देशभरातील 554 रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली, या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण मुंबईतील चर्नी रोड स्टेशन परिसरातील रेल्वेच्या कार्यालयात करण्यात आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, अमृत भारत स्थानक विकास योजना म्हणजे एक ऐतिहासिक कार्यक्रम झालं आहे. आज सगळ्या सुविधा प्रवाशांना मिळत आहे. गेल्या 10 वर्षात रेल्वेत अमूलाग्र बदल झाला. पूर्वीचे स्थानक आताचे स्थानक यात बराच फरक आहे, वातानुकूलित रेल्वे बुलेट ट्रेन वंदे भारत असे अनेक बदल मोदीजींच्या नेतृत्वात आपण पाहत आहोत. ही क्रांती घडलेली आहे. आज सर्व सामान्य माणसाला रेल्वे प्रवास सोयिस्कर व्हावा यासाठी काम सुरू आहे. याचे सर्व श्रेय मोदींना जाते. आधीच्या सरकारच्या काळाता जे सांगत होते की बजेट नाही. तिथे आता 45 हजार कोटीच काम केलं जात आहे. महाराष्ट्रातील अनेक स्थानकांच रिमोड्युलिंग केले जात आहे. त्याचा विकास होत आहे