एक्स्प्लोर
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि मोदी मेट्रोनं अक्षरधाम मंदिरात, प्रवासात सेल्फीही!

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल 4 दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान टर्नबुल यांनी दिल्ली मेट्रोतून प्रवास केला. यावेळी दोघांनी एकत्र सेल्फीही काढला. मोदी आणि टर्नबुल थोड्या वेळापूर्वी अक्षरधाम मंदिरात गेले आहेत. पंतप्रधान टर्नबुल यांना मोदींनी अक्षरधाम मंदिरासंदर्भात माहिती दिली. पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात 6 करारावर सह्या करण्यात आल्या. ज्यामध्ये दहशतवादाविरुद्ध एकत्र लढण्याच्या कराराचाही समावेश आहे. आज सकाळी राष्ट्रपती भवनात पंतप्रधानांनी त्यांचं औपचारिक स्वागत केल्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला गेला. यानंतर त्यांना राजघाटावर पोहचून महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. सप्टेंबर 2015 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर टर्नबुल यांचा हा पहिला भारत दौरा आहे. पंतप्रधान मोदींसोबतचा सेल्फी शेअर करुन ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टर्नबुल यांनी ट्विट केलं की, 'नरेंद्र मोदींसोबत दिल्ली मेट्रोच्या ब्ल्यू लाईनमध्ये आहे. 2002 पासून 202 किमीपर्यंत 159 स्टेशन बनवण्यात आले आहेत.'
पंतप्रधान मोदींनी देखील आपला टर्नबुल यांच्यासोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केला. तसेच अक्षरमधाम मंदिरात जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.With @narendramodi on the Delhi Metro Blue Line - 212 kms & 159 stations since 2002 pic.twitter.com/O4Zr2695Sg
— Malcolm Turnbull (@TurnbullMalcolm) April 10, 2017
अक्षरधाम मंदिराची नोंद गिनीज बुकात करण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठा परिसर असणारं हे मंदिर आहे. हे मंदिर जवळजवळ 1000 एकर परिसरात पसरलं आहे. दिल्लीत यमुना नदीच्या तीरावर हे मंदिर आहे. अवघ्या 5 वर्षात हे प्रचंड मोठं मंदिर बांधण्यात आलं होतं. याचं उद्घाटन 6 नोव्हेंबर 2005 साली करण्यात आलं होतं. अक्षरधाम मंदिर ज्योतिर्धर भगवान स्वामीनारायण यांच्या पुण्य स्मृतीनिमित्त तयार बांधण्यात आलं आहे. संबंधित बातम्या: मोदींकडून ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना कोहली-स्मिथचं उदाहरणOn board the Delhi Metro with PM @TurnbullMalcolm. We are heading to the Akshardham Temple. pic.twitter.com/AiP4BAqhLY
— Narendra Modi (@narendramodi) April 10, 2017
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र






















