एक्स्प्लोर

Narendra Modi : बचावकार्याचे यश भावुक करणारे, कर्मचाऱ्यांच्या शौर्याला आणि जिद्दीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला सलाम

Narendra Modi Tweet On Uttarkashi Tunnel Rescue : तब्बल 17 दिवसानंतर या कर्मचाऱ्यांची सुटका झाली असून कर्मचाऱ्यांनी 'भारत माता की जय'चा नारा दिला. 

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीतील (Uttarakhand) बोगद्यात अडकलेल्या 41 कर्मचाऱ्यांची 17 दिवसानंतर सुटका झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) अभिनंदन केलं आहे. कर्मचारी हे आता आपल्या प्रियजणांना भेटणार आहेत, बचाव कार्यात सामिल असलेल्या सर्वांच्या जिद्दीला आणि धैर्याला सलाम करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. 

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिल्क्यारा बोगद्यात 17 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांची सुटका करण्यात आली आहे. सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांपैकी विजय होरी यांना प्रथम बाहेर काढण्यात आले. यानंतर गणपती होरी यांना बाहेर काढण्यात आले. या कामगारांसाठी रॅट मायनिंग करणारे देवदूत म्हणून आले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सर्व मजुरांचे अभिनंदन केलं आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्मचाऱ्यांच्या जिद्दीला सलाम केलं आहे. या मिशनमध्ये सामील असलेल्या प्रत्येकाने माणुसकी आणि टीम वर्कचे एक अद्भुत उदाहरण समोर ठेवले आहे असं त्यांनी म्हटलं आहे. 

काय म्हणाले नरेंद्र मोदी? (PM Modi Tweet On Uttarkashi Tunnel Rescue) 

उत्तरकाशीतील आमच्या मजूर बांधवांच्या बचावकार्याचे यश सर्वांनाच भावुक करत आहे.
 
बोगद्यात अडकलेल्या मित्रांना मी सांगू इच्छितो की तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देत आहे. मी तुम्हा सर्वांना चांगले आणि चांगले आरोग्य इच्छितो.

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आमचे हे मित्र आता त्यांच्या प्रियजणांना भेटणार आहेत ही समाधानाची बाब आहे. या आव्हानात्मक काळात या सर्व कुटुंबांनी दाखवलेल्या संयमाचे आणि धैर्याचे कौतुक करता येणार नाही.

या बचाव कार्याशी संबंधित सर्व लोकांच्या कार्याला मी सलाम करतो. त्यांच्या शौर्याने आणि जिद्दीने आमच्या कामगार बांधवांना नवसंजीवनी दिली आहे. या मिशनमध्ये सामील असलेल्या प्रत्येकाने माणुसकी आणि टीमवर्कचे एक अद्भुत उदाहरण समोर ठेवले आहे.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
Sonia Gandhi : राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात, सोनिया गांधी मंदिरमार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल, दिल्लीत मोठ्या घडामोडी
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात, सोनिया गांधी मंदिरमार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल, दिल्लीत मोठ्या घडामोडी
मोर्चात सहभागी न होता बर्गर खायला गेले, कॉकरोच जनता पार्टीकडून विजेता दहियांवर कारवाई, प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी 
मोर्चात सहभागी न होता बर्गर खायला गेले, कॉकरोच जनता पार्टीकडून विजेता दहियांवर कारवाई, प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी 

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
Embed widget