एक्स्प्लोर

Modi Cabinet Portfolio : मोदी कॅबिनेट 3.0चं खातेवाटप जाहीर! अमित शाह पुन्हा गृहमंत्री, तर गडकरींकडे रस्ते आणि परिवहन मंत्रालय

PM Narendra Modi Cabinet Portfolio : नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह 72 मंत्र्यांनी पद आणि गोपिनीयतेची शपथ घेतली होती.

नवी दिल्ली : मोदी कॅबिनेटचा शपथविधी पार पडल्यानंतर आज खातेवाटप जाहीर (Modi Cabinet Portfolio) करण्यात आलं आहे. अमित शाह यांच्यावर पुन्हा एकदा गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालय एस. जयशंकर यांच्याकडे देण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह 72 मंत्र्यांनी पद आणि गोपिनीयतेची शपथ घेतली होती. त्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.

मोदी कॅबिनेटचं खातेवाटप जाहीर! 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 जणांनी रविवारी 9 जूनला कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. महाराष्ट्रातील 6 जणांचा यामध्ये समावेश होता. शपथ घेतल्यानंतर या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर आज हे खातेवाटप जाहीर करण्यात आलं. 

त्यानुसार नितीन गडकरी यांना पुन्हा त्यांचं रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एस जयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालय मिळालं आहे.

बिहारने केली होती रेल्वे मंत्रालयाची मागणी

बिहारमधील घटकपक्ष असलेल्या नितीश कुमार यांनी रेल्वे मंत्रालयाची मागणी केली असल्याची माहिती होती. पण हे खातं भाजपच्या अश्विनी वैष्णव यांच्याकडेच राहणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी कुणाकडे? पाहा संपूर्ण यादी

अमित शाह- गृहमंत्रालय
राजनाथ सिंह- संरक्षण मंत्रालय
एस जयशंकर - परराष्ट्र
नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक 
निर्मला सीतारमन - अर्थमंत्रालय
शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय
जितन राम मांझी- सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय 
पियुष गोयल -वाणिज्य
अन्नपूर्णा देवी- महिला आणि बाल विकास मंत्रालय
भूपेंदर यादव - पर्यावरण
के राममोहन नायडू- नागरी उड्डाण मंत्रालय
जेपी नड्डा- आरोग्य मंत्रालय
सर्वानंद सोनोवाल - पोर्ट शिपिंग मंत्रालय
सी आर पाटील- जलशक्ती
किरण रिजीजू- संसदीय कार्यमंत्री 
धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्री
अर्जुनराम मेघवाल- कायदा मंत्री
चिराग पासवान - क्रीडा मंत्री, अन्न प्रक्रिया मंत्री 
प्रल्हाद जोशी - ग्राहक कल्याण मंत्रालय
ज्योतिरादित्य शिंदे- सूचना आणि प्रसारण मंत्री
मनसुख मंडाविया- कामगार मंत्री
हरदीप सिंह पुरी- पेट्रोलियम मंत्री
एचडी कुमारस्वामी - अवजड उद्योग मंत्री
मनोहर लाल खट्टर- उर्जा मंत्री, गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय
राजीव राजन सिंह - पंचायत राज मंत्रालय
विरेंद्र कुमार - सामाजिक न्याय मंत्रालय
ज्युएल ओराम- आदिवासी विकास मंत्री
गिरीराज सिंह - वस्त्रोद्योग मंत्रालय
गजेंद्रसिंह शेखावत- सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालय
किशन रेड्डी - कोळसा आणि खाणकाम मंत्रालय

राज्यमंत्री स्वतंत्र कारभार

राव इंद्रजित सिंह- नियोजन, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
जितेंद्र सिंह - विज्ञान आणि तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यलय 
अर्जुन राम मेघवाल - कायदा आणि न्याय मंत्रालय
प्रतापराव जाधव - आयुष मंत्रालय
जयंत चौधरी - कौशल्य विकास

राज्यमंत्री 

श्रीपाद नाईक- गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री
शोभा करंदाजे -  सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
शांतनु ठाकुर - पोर्ट शिपिंग मंत्रालय, राज्यमंत्री
रवनीत बिट्टू- अल्पसंख्यांक राज्यमंत्री
जितीन प्रसाद - वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
कृष्णन चौधरी- सहकार मंत्रालय
रामदास आठवले - सामाजिक न्याय मंत्रालय
नित्यानंद राय- गृह मंत्रालय
अनुप्रिया पटेल - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
व्ही सोमन्ना - जलशक्ती, रेल्वे मंत्रालय
चंद्रशेखर प्रेमासनी- ग्रामीण विकास मंत्रालय
एस पी बघेर - दुग्ध विकास मंत्रालय
क्रितीवर्धन सिंह - पर्यावरण 
बी एल वर्मा - सामाजिक न्याय
सुरेश गोपी - पेट्रोलियम, पर्यंटन
एल मुरुगन- माहिती आणि प्रसारण
अजय तम्ता - रस्ते वाहतूक 
बंदी संजय कुमार - गृहमंत्री
कमलेश पासवान - कोळसा मंत्रालय
सतीश चंद्र दुबे - खणन मंत्रालय
संजय सेठ - संरक्षण राज्यमंत्री
रणवीर सिंह - अन्न प्रक्रिया
दुर्गादास उइके- आदिवासी विकास मंत्रालय
रक्षा खडसे - युवक कल्याण मंत्रालय
सुकांता मुजुमदार - शिक्षण
सावित्री ठाकुर - महिला आणि बालकल्याण
तोखन साहू - शहर विकास मंत्रालय
भूषण चौधरी - जलशक्ती
भूपेंद्र राजू श्रीनिवास वर्मा - अवजड उद्योग मंत्रालय
हर्ष मल्होत्रा - कॉर्पोरेट अफेअर्स
निमुबेन जयंतीभाई बाम्भनिया - ग्राहक निवारण आणि अन्न वितरण 
मुरलीधर मोहोळ - सहकार , नागरी उड्डाण मंत्रालय
जॉर्ज कुरियन - अल्पसंख्याक
पवित्रा मार्गारेट - परराष्ट्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget