एक्स्प्लोर
9.30 पर्यंत ऑफिसला पोहोचा, घरातून काम टाळा; पंतप्रधानांची मंत्र्यांना सूचना
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (12 जून) केंद्रीय मंत्रिपरिषदेची पहिली बैठक झाली. यावेळी मोदींनी आपल्या मंत्र्यांना अनेक सूचना केल्या.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिपरिषदेच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कामाचा पद्धती स्पष्ट करत सगळ्या मंत्र्यांना वेळेवर कार्यालयात पोहोचण्याचा सल्ला दिला आहे. मंत्र्यांनी सकाळी 9.30 पर्यंत ऑफिसला पोहोचावं आणि घरातून काम करणं टाळावं, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 40 दिवसांच्या अधिवेशन काळात कोणीही परदेश दौरा करु नये, असंही मोदींनी मंत्र्यांना सांगितलं.
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (12 जून) केंद्रीय मंत्रिपरिषदेची पहिली बैठक झाली. यावेळी मोदींनी आपल्या मंत्र्यांना अनेक सूचना केल्या. सोबतच मंत्रिपरिषदेच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुस्लीम महिलांसाठी तिहेरी तलाक विधेयक सादर करण्यासह इतर अध्यादेशांवरही चर्चा झाली.
वेळेवर ऑफिसमध्ये पोहोचण्यावर भर देताना नरेंद्र मोदी म्हणाले की, सर्व मंत्र्यांनी वेळेत कार्यालयात पोहोचावं आणि काही वेळ काढून अधिकाऱ्यांकडून मंत्रालयाच्या कामकाजाची माहिती घ्यावी. तसंच ऑफिसचं काम ऑफिसमध्येच करा, घरातून काम करणं टाळा.
दुसऱ्यांसाठी चांगलं आणि उदाहरण सिद्ध व्हावं म्हणून मोदींनी ही सूचना केली आहे. स्वत:चं उदाहरण देताना पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, "गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी अधिकाऱ्यांसोबत वेळेतच ऑफिसमध्ये पोहोचायचो."
"मंत्र्यांनी नव्याने निवडलेल्या खासदारांची भेट घ्यावी, कारण खासदार आणि मंत्री यांच्यात फार फरक नसतो. पाच वर्षांचा आराखडा बनवून कामाची सुरुवात करा आणि त्याचा परिणाम 100 दिवसात दिसला पाहिजे," अशी तंबीही मोदींनी दिली.
मंत्रिपरिषदेच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांसोबत मंत्र्यांच्या वागणुकीवरही सल्ला दिला. पक्षाचा कार्यकर्ता जर मंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागत असेल तर त्यांना वेळ द्यावा. कॅबिनेट मंत्र्यांनी आपापल्या राज्यमंत्र्यांना खात्याचं काम द्यावं आणि त्यात समन्वय ठेवण्याचंही सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement