एक्स्प्लोर

PM Modi Joe Biden : ड्रोन खरेदी, सेमीकंडक्टरसाठी गुंतवणूक...PM मोदी आणि बायडन यांच्या बैठकीत काय झाले?

PM Modi Joe Biden Meeting : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी भारत-अमेरिकेत द्विपक्षीय चर्चा झाली. दोन देशांमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठक सकारात्मक झाली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

नवी दिल्ली जी-20 परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आज, शुक्रवारी सायंकाळी राजधानी दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी भारत-अमेरिकेत द्विपक्षीय चर्चा झाली. दोन देशांमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठक सकारात्मक झाली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. या बैठकीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीमध्ये कायम सदस्यत्व, चांद्रयान-3 मोहिमेबाबतही चर्चा झाली. दोन्ही देशांच्यावतीने संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. 

दोन्ही देशांमध्ये काय चर्चा झाली?

दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी करून म्हटले आहे की 2024 मध्ये भारताने आयोजित केल्या जाणाऱ्या क्वाड गटाच्या बैठकीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे स्वागत करण्यास भारत उत्सुक आहेत. 2024 च्या सुरुवातीच्या महिन्यांत क्वाड सदस्य देशांची बैठक आयोजित केली जाणार आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश या क्वाड गटात आहे.

पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीत बायडन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायम सदस्यत्वाला पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 या अंतराळ मोहिमेबाबतही अभिनंदनही केले.

संयुक्त निवेदनानुसार, राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी अमेरिकेकडून 31 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याबाबत भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या विनंती पत्राचे स्वागत केले. 

द्विपक्षीय बैठकीत दोन्ही नेत्यांनी मजबूत जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळी तयार करण्यावर भर दिला. या अंतर्गत Microchip Technology Inc. भारतात व्यवसाय आणि संशोधन वाढवण्यासाठी 300 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करेल. याशिवाय Advanced Micro Devices ने पुढील 5 वर्षात भारतात 400 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. दोन्ही नेत्यांनी जून 2023 मध्ये अमेरिकन कंपन्यांनी मायक्रोन, एलएएम रिसर्च आणि अप्लाइड मटेरिअल्सने केलेल्या घोषणेच्या अंमलबजावणीबद्दल समाधान व्यक्त केले.

संयुक्त निवेदनात काय म्हटले?

भारत आणि अमेरिकेने संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, बायडन यांनी भारताच्या G-20 अध्यक्षपदाचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी आणि बायडन यांनी G-20 साठी त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. G-20 परिषदेचे समान उद्दिष्ट्ये साध्य करू, असा विश्वास दोन्ही देशांनी व्यक्त केला.  

द्विपक्षीय चर्चेत अमेरिकेचे अर्थमंत्री जेनेट येलेन, परराष्ट्र सचिव अँथनी ब्लिंकन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन हे उपस्थित होते. तर भारतीय शिष्टमंडळात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा समावेश होता.

महत्त्वाच्या बातम्या

काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला

Embed widget