पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न अचानक पडलेलं नाही, गेल्या पाच वर्षात देश मजबूत झाला : नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या व्यापार आणि उद्योगांच्या शिखर संघटनेच्या वार्षिक सभेत भाषण केले. यावेळी मोदी यांनी पुन्हा एकता पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेबाबत भाष्य केले.
नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था सातत्याने घसरत आहे. देशभरात महागाई वाढू लागली आहे. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत काहीही बोलत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून टीका सुरु आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर नरेंद्र मोदींनी देशाची अर्थव्यवस्था आणि जीएसटीबाबत भाष्य केले आहे. भारताच्या व्यापार आणि उद्योगांच्या शिखर संघटनेच्या (Associated Chambers of Commerce and Industry of India ) वार्षिक सभेत मोदी बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेची घोषणा केली. परंतु ही गोष्ट अचानक आलेली नाही. मागील पाच वर्षात देशाने स्वतःला मजबूत केलं आहे. त्यामुळे देश आता पाच ट्रिलिय अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहू शकतो. आमच्या सरकारने देशाची जीएसटीबाबतची मागणी पूर्ण केली. काँग्रेसला निशाणा करत मोदी म्हणाले की, 70 वर्षांची सवय बदलण्यासाठी थोडा वेळ लागेल.
या कार्यक्रमात बोलताना मोदींनी व्यापार आणि उद्योगांच्या शिखर संघटनेच्या सदस्यांचे कौतुक केले. मोदी म्हणाले की, आपल्या देशाकडे मोठे सामर्थ्य आहे. या सामर्थ्याच्या जोरावर आपण पुढे जाण्याचे लक्ष्य ठेवायला हवे. मोठे लक्ष्य समोर ठेवायला हवे. आपण सर्वांनी एकत्र येत लक्ष्य प्राप्त करण्यासाठी मेहनत करायला हवी. लक्ष्यप्राप्तीसाठी आपण स्वतःहून पुढाकार घेतला नाही तर तो एक सरकारी कार्यक्रम होईल.
Talks on making India USD 5 trillion economy didn't come all of a sudden: PM Modi
Read @ANI Story | https://t.co/XrokthukSD pic.twitter.com/dUZ6V7FKmr — ANI Digital (@ani_digital) December 20, 2019
PM Narendra Modi at ASSOCHAM annual conference: FDI inflow has increased in India in last few years and I have two meanings of FDI. One popularly known as Foreign Direct Investment and the other I call is 'First Develop India' pic.twitter.com/5S2dMPe8RN
— ANI (@ANI) December 20, 2019
PM Narendra Modi: I today want to assure those associated with banking sector and corporate sector, that we have been to an extent successful in controlling the earlier weaknesses. So take decisions,invest and spend without any hesitation. pic.twitter.com/LB8ht37ubB
— ANI (@ANI) December 20, 2019