एक्स्प्लोर
'धन्यवाद', चिमुकलीच्या पत्राला पंतप्रधानांचं उत्तर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चाहत्यांची संख्या कोणत्याही अभिनेत्यापेक्षा कमी नाही. शिवाय त्यात लहान मुलंही मागे नाहीत. मोदींची चाहती असलेल्या सहावीत शिकणाऱ्या एका मुलीने पंतप्रधानांना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी पत्र लिहिलं.
एवढंच नव्हे तर तिच्या पत्राला पंतप्रधान मोदींनी 'धन्यवाद' असं उत्तरही दिलं. मोदींच्या उत्तराने कानपूरमध्ये राहणाऱ्या अदितीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
"चांगली कामगिरी आणि चांगल्या योजनांबाबत मी पंतप्रधान मोदींना पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान माझ्या पत्राला नक्कीच उत्तर देतील, असा विश्वास मला होता. त्यांच्या उत्तराने मी खुपच खूश आहे," असं आदितीने सांगितलं.
अदितीच्या पत्राला पंतप्रधानांचं उत्तर
"मोदींकडून आलेलं हे पत्र अदितीला 11 एप्रिलला मिळालं. खुद्द पंतप्रधानांनी पत्राचं उत्तर दिल्याने अदितील अभिमान वाटत आहे. मी यापुढेही पंतप्रधान मोदींना त्यांच्या कामगिरीसाठी पत्र लिहिन," असंही ती म्हणाली.
जेव्हा तिला विचारलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगली कामगिरी करत आहेत का? यावर ती ठामपणे म्हणाली 'हो'. "त्यांनी देशासाठी असंच काम करत राहावं आणि सगळ्यांना सकारात्मक मार्गदर्शन करावं," अशी अपेक्षा अदितीने व्यक्त केली आहे.
"आपली दहा वर्षांची मुलगी एवढं छान लिहू शकते यावर अदितीच्या आईचा विश्वासच बसत नव्हता. सरकारच्या कामाबाबत, योजनांबाबत अदितीला माहित असेल, याची मला कल्पनाही नव्हती," असं अदितीची आई म्हणाली.
"आम्ही पंतप्रधान मोदींच्या उत्तराची अपेक्षा केली नव्हती. पण अदितीने छान लिहिलं होतं. अदितीने पत्रात पंतप्रधानांनी देशात सुरु केलेल्या योजना आणि तिच्या शाळेविषयी लिहिलं होतं," असंही अदितीच्या आईने सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement