एक्स्प्लोर

मोदी लाट कायम, आता निवडणुका झाल्या तर NDA ला बहुमत : ABP-IMRB सर्व्हे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या दोन वर्षांत देशात बदल झाले आहेत का? नागरिकांचे अच्छे दिन आले का? देशाच्या विकासाचा वेग वाढला की अपेक्षांचं ओझं वाढलं? मोदी सरकारच्या काळात देशाचा चेहरा किती बदलला? किती लोकांचं आयुष्य बदललं? अखेर काय आहे देशाचा मूड?     मोदी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त एबीपी आणि IMRB INTERNATIONAL या सर्व्हे एजन्सने देशाचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मोदी सरकारच्या कार्यकाळात देशात अच्छे दिन आले का?, पंतप्रधान म्हणून मोदींचं काम कसं आहे? देशातील सर्वात लोकप्रिय नेता कोण? आणि महत्त्वाचा प्रश्न आता लोकसभा निवडणुका झाल्या तर कोणाला मत देणार?, असे प्रश्न मतदारांना विचारले.     जर आताच निवडणुका झाल्या तर फार बदल होणार नाही. मोदी लाट अद्यापही कायम आहे. पंजाब वगळता दुसऱ्या ठिकाणी भाजपला कोणतंही नुकसान होणार नसल्याचं दिसतं. आसाम आणि उडिसामध्ये यश मिळेल. यूपीमध्ये सध्याची स्थितीच कायम राहण्याची शक्यता आहे. तर बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने गमावलेली जागा पुन्हा मिळवण्याचा अंदाज आहे. दक्षिणमध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये भाजपची मतं आणि जागा वाढताना दिसत आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपच्ये मताचे टक्के वाढण्याची चिन्ह आहेत, मात्र जागा कमी होतील.     दुसरीकडे यूपीएच्या जागांमध्ये फारसा फरक दिसत नाही. पण त्यांच्या व्होटशेअरमध्ये वाढ होईल.     काय आहे देशाचा मूड ?   1. सर्वात लोकप्रिय नेता कोण? पंतप्रधान नरेंद्र मोदी - 47 % राहुल गांधी  -  06% सोनिया गांधी  -  09% नितीश कुमार  -  04% अरविंद केजरीवाल  - 06%     2. दोन वर्षात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचं काम कसं आहे? खूप चांगलं - 9% चांगलं  - 40% साधारण - 32% वाईट  - 15% अतिशय वाईट - 3%   3. मोदी सरकारच्या दोन वर्षात अच्छे दिन आले? होय - 38% नाही - 44% माहित नाही -  18%     4. नितीश 2019 मध्ये पंतप्रधान बनू शकतात? होय -16% नाही - 49% माहित नाही - 35%     5. प्रत्येक भारतीयाला 'भारत माता की जय'चा जयघोष करायला हवा? होय - 79% नाही - 11% माहित नाही - 10%     6. मोदी सरकारच्या कार्यकाळात असहिष्णुता वाढल्याचा आरोप योग्य आहे? होय - 29% नाही - 39% माहित नाही - 32%     7. जेएनयू आणि इतर विद्यापीठातील वाद मिटवण्यात मोदी सरकारला यश आलं? होय - 44% नाही - 42% माहित नाही - 14%     8. काँग्रेसच्या नेत्यांनी ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यात लाच घेतली? होय -  67% नाही - 17% माहित नाही  - 16%     9. काळा पैसा परत आणण्याबाबत मोदी सरकारची कामगिरी कशी आहे? अपेक्षेपेक्षा चांगली - 7% अपेक्षेप्रमाणे -  18% अपेक्षेपेक्षा कमी  -  42% माहित नाही - 32%     10. महागाई रोखण्यासाठी सरकारचं काम कसं आहे? अपेक्षेपेक्षा चांगलं -  14% अपेक्षेप्रमाणे - 21% अपेक्षेपेक्षा कमी   – 35% माहित नाही – 30%     11. स्वातंत्र्यानंतर सर्वात चांगले पंतप्रधान कोण? पंतप्रधान नरेंद्र मोदी - 24% अटल बिहारी वाजपेयी - 20% इंदिरा गांधी  -  20% जवाहरलाल नेहरु -   6%     12. आता निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?   एनडीएला किती जागा? उत्तर भारत - 126 जागा दक्षिण भारत  - 50 जागा पूर्व  भारत - 62 जागा पश्चिम  भारत - 104 जागा एकूण - 342 जागा (+3)   यूपीएला किती जागा? उत्तर भारत - 09 जागा दक्षिण भारत - 21 जागा पूर्व भारत - 24 जागा पश्चिम भारत - 12 जागा एकूण - 66 जागा (+4)   लेफ्टला किती जागा? उत्तर भारत  - 0 जागा दक्षिण भारत  - 8 जागा पूर्व  भारत - 6 जागा पश्चिम भारत - 0 जागा एकूण - 14 जागा (+4)   इतर उत्तर भारत - 96 जागा दक्षिण  भारत - 55 जागा पूर्व भारत - 50 जागा पश्चिम भारत - 0 जागा एकूण - 121 जागा (-11)   कसा झाला सर्व्हे? हा सर्वे 7 मे ते 16 मे दरम्यान झाला. एकूण 14 हजार 658 मतदारांना त्यांचं मत विचारलं. 18 राज्यांमध्ये 101 लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी बातचीत करण्यात आली. हा सर्व्हे युरोपियन सोसायटी फॉर ओपिनियन अँड मार्केटिंग रिसर्च म्हणजेच ESOMAR च्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
Sonam Wangchuk on Pradhan Resignation :
"तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं?"; मध्यरात्री उपोषण मागे घेताना सोनम वांगचुक यांनी दिली महत्त्वाची माहिती
Fast Track Court for NEET: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाच मोठं पाऊल; विशेष न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगांची नियुक्ती
नीट पेपरफुटीप्रकरणी पंतप्रधानांच्या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाच मोठं पाऊल; फास्ट ट्रॅक कोर्टाचे विशेष न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगांची नियुक्ती
Rahul Gandhi on PM Modi: 'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल
'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर कडाडून हल्लाबोल

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk on Pradhan Resignation :
"तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं?"; मध्यरात्री उपोषण मागे घेताना सोनम वांगचुक यांनी दिली महत्त्वाची माहिती
Fast Track Court for NEET: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाच मोठं पाऊल; विशेष न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगांची नियुक्ती
नीट पेपरफुटीप्रकरणी पंतप्रधानांच्या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाच मोठं पाऊल; फास्ट ट्रॅक कोर्टाचे विशेष न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगांची नियुक्ती
Palghar Rain News: पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
Vanita Kharat Joined Students Protest: हातात संविधान अन्...; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर विद्यार्थ्यांसोबत उतरल्या रस्त्यावर, PHOTOs
हातात संविधान अन्...; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर विद्यार्थ्यांसोबत उतरल्या रस्त्यावर, PHOTOs
Mumbai Protest Video Viral: मुंबईतील आंदोलनात सिव्हील ड्रेसमधील पोलिसाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा विरोधकांचा आरोप; दादरमधील व्हिडीओ व्हायरल
मुंबईतील आंदोलनात सिव्हील ड्रेसमधील पोलिसाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा विरोधकांचा आरोप; दादरमधील व्हिडीओ व्हायरल
Rahul Gandhi on PM Modi: 'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल
'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर कडाडून हल्लाबोल
Kareena Kapoor Khan On NEET Paper Leak Row: 'गेल्या काही दिवसांपासून मी विचार करतच होते, पण...'; अखेर करिना कपूरनं मौन सोडलं, विद्यार्थी आंदोलनावर थेटच भाष्य
'गेल्या काही दिवसांपासून मी विचार करतच होते, पण...'; अखेर करिना कपूरनं मौन सोडलं, विद्यार्थी आंदोलनावर थेटच भाष्य
High Court on Alimony: पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, उच्चशिक्षित महिलेची याचिका फेटाळली
पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, उच्चशिक्षित महिलेची याचिका फेटाळली
Embed widget