एक्स्प्लोर

बाथरुममध्ये रेनकोट घालणं मनमोहन सिंहांकडून शिका : मोदी

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात जवळपास 35 वर्षे देशाची अर्थव्यवस्था माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याकडे होती. मात्र त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. त्यामुळे बाथरुममध्ये रेनकोट घालून अंघोळ कशी करावी, ते मनमोहन सिंहांकडून शिकावं, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार बरसले. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदारांनी गदारोळ करत सभागृह सोडलं. त्यामुळे काही काळासाठी मोदींना भाषण थांबवावं लागलं. त्यांनी नोटाबंदीवरही भाष्य केलं. इंदिरा गांधींवर टीका बसू यांनी सांगितलं होतं की, इंदिरा गांधी यांचं सरकार काळ्या पैशावरच टिकून आहे. त्यांचं राजकारण काळ्या पैशावर टिकून आहे. त्यामुळे नोटाबंदीची गरज असल्याचा रिपोर्ट लागू करण्यात आला नाही आणि दाबून ठेवण्यात आला, असा घणाघातही मोदींनी केला. ''नोटाबंदी ही जगभरातील अर्थतज्ञांसाठी केस स्टडी'' नोटाबंदीच्या निर्णयाला देशातील जनतेने पाठिंबा दिला. देशातील जनता अडचणींशी लढण्यासाठी त्रास सहन करायलाही तयार आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं मोदी म्हणाले. तसंच भारतातील नोटाबंदी ही जगभरातील अर्थतज्ज्ञांसाठी एक केस स्टडी आहे, कारण एवढा मोठा निर्णय जगभरात कुठेच झाला नव्हता, असंही त्यांनी सांगितलं. ''नोटाबंदीमुळे 40 दिवसांत 700 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण'' नोटाबंदीचा फटका खऱ्या अर्थाने बेईमानांना बसला असून इमानदार लोकांना ताकद मिळाली आहे. काळा पैसा, दहशतवादी आणि नक्षलवाद्यांना नोटाबंदीचा फटका बसला. नोटाबंदीनंतर 40 दिवसात 700 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं, अशी माहिती मोदींनी दिली. ''डिजिटल इंडियासाठी सकारात्मकता आवश्यक'' देशाचा प्रत्येक कानाकोपरा डिजिटल नाही, मात्र त्यासाठी सकारात्मक मानसिकता तयार करणं गरजेचं आहे. डिजिटल इंडिया करण्यासाठी घेतलेला निर्णय चूकिचा म्हटल्याने देश डिजिटल होणार नाही. त्यामुळे विरोधकांनी सहकार्य करावं, असं आवाहन मोदींनी केलं. डिजिटल व्यवहारांचा फायदा लोकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. भीम अॅप विकसित करण्यासाठी एकही रुपया खर्च करावा लागला नाही, असं मोदींनी सांगितलं. दरम्यान माझ्यावर किंवा सरकारवर आरोप होणं मी समजू शकतो, पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला राजकारणात का ओढलं जात आहे, असा सवालही मोदींनी केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Delhi Meeting | राज्यात 7 कॅबिटने, 2 राज्यमंत्रिपदासाठी अजितदादा आग्रहीGadchiroli Earthquake | गडचिरोलीत सकाळदरम्यान भूकंपाचे धक्के, CCTV व्हिडिओ!Earthquake Bhandara | गडचिरोली, भंडारा, गोंदियात भूकंपाचे धक्के, तेलंगणात भूकंपाचं केंद्रस्थानTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 4 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Embed widget