एक्स्प्लोर

India China Face off |चीनच्या तावडीतून भारताच्या 10 जवानांची अखेर सुटका! सरकारचं मात्र घटनेवर मौन

चीनच्या तावडीतून भारताच्या 10 जवानांची सुटका झाल्याचे वृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं आलं आहे. मात्र, सरकारकडून या घटनेवर कुठलीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र, या बातमीचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने खंडन केलं आहे. आमच्या ताब्यात भारतीय सैनिक नसल्याचं चीनने म्हटलं आहे.

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवरच्या घटनेबाबत आज एक नवी धक्कादायक माहिती समोर येतेय. चीनच्या तावडीत कालपर्यंत आपले 10 जवान होते, काल त्यांची अखेर सुटका झालीय. द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रानं या घटनेशी संबंधित लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं ही बातमी दिलीय. पण सरकारनं त्याबाबत अजून कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाहीय. भारताचे 10 जवान चीनच्या तावडीत होते की नव्हते? या 10 जवानांची काल सुटका झाल्याच्या बातम्यांवर सरकारचं अद्याप काहीच स्पष्टीकरण का नाही? नेमकं सत्य काय आहे हे का सांगितलं जात नाहीय?, असे प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत. मात्र, या बातमीचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने खंडन केलं आहे. आमच्या ताब्यात भारतीय सैनिक नसल्याचं चीनने म्हटलं आहे.

भारत चीन सीमेवर झालेल्या घटनेबद्दल अजून काय काय लपवलं जातंय? 10 जवानांची सुटका झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की हे जवान नेमके पकडले कधी होते. सरकारनं तर त्याबद्दल अजून काहीच शब्द काढलेला नाहीय. पण या घटनेशी संबंधित अनेक लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं अनेक प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकांनी मात्र हे वृत्त दिलंय. काल म्हणजे गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता भारताच्या 10 जवानांची सुटका चीननं केल्याचं वृत्त आहे. या 10 जणांमधे 2 मेजर, 2 कॅप्टन असे एकूण 4 अधिकारी तर 6 सैनिक आहेत. गेल्या चार दिवसांपासून जी लष्करी पातळीवरची चर्चा सुरु होती, ती याच जवानांच्या सुटकेसाठी होती असाही दावा आता केला जातोय.

India-China Face Off | भारत-चीन सीमेवरील हिंसक झटापटीनंतर पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली!

सरकारकडून घटनेवर मौन 15-16 जूनच्या मध्यरात्री सीमेवर हिंसक झटापट झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं नेमकं काय झालं याची माहिती बाहेर येतेय. 20 जवान तर शहीद झाले, पण काही जवान बेपत्ता असल्याच्याही बातम्या होत्या. त्याबाबत सरकारनं कुठलं वक्तव्य केलं नव्हतं. काल संध्याकाळी जेव्हा या जवानांना सुखरुप परत आणण्यात यश आलं, त्यानंतर आर्मीनं फक्त एक त्रोटक वक्तव्य जाहीर केलं की कुठलंही भारतीय पथक बेपत्ता नाहीय. या त्रोटक वक्तव्यातून काहीच स्पष्ट होत नाही. काही बड्या लष्करी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जेव्हा या सर्व जवानांची सुटका झाली, त्यानंतरच हे स्टेटमेंट लष्करानं केलं असावं. हे 10 जवान परत येणं ही भारतासाठी प्रतिष्ठेची बाब होती, त्यामुळेच चर्चेच्या, प्रतिक्रियेच्या पातळीवर गेले चार दिवस सावधानता बाळगली जात असावी.

या 10 जवानांची सुटकेनंतर मेडिकल चाचणी होणार आहे, त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्याकडून माहिती घेतली जाईल असंही सांगितलं जातंय. 15 जूनची घटना झाल्यानंतरही मेजर जनरल स्तरावर चर्चेच्या तीन फेऱ्या सुरु होत्या. त्यात भारताच्या दृष्टीनं या 10 जणांची सुटका हाच मुद्दा होता. आता पुढच्या बैठकीत सीमेवरच्या तणावावर चर्चा होणार आहे. चीननं गलवान खोऱ्यावर नजर ठेवलीय, लडाखमधला लष्करीदृष्ट्या महत्वाचा पॉईटं फिंगर 4 ही त्यांच्या आवाक्यात आहे. आता आपल्या हद्दीत आलेल्या सैनिकांची आपण कशी सुटका केली हे औदार्य आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखवायलाही ते मोकळे. त्यामुळे या सगळ्या खेळात चीनला हुशारीनं उत्तर द्यायला हवं असं लष्करातल्या सूत्रांचं म्हणणं आहे. या सुटकेबद्दल सरकारचं काही अधिकृत वक्तव्य येतंय का हेही पाहणं महत्वाचं असेल.

Aircraft P8I at LAC | चिनी सैन्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी नौदलाकडून 'पी 8 आय' एअरक्राफ्ट तैनात

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
दिल्ली पेलेट गन हल्ला प्रकरण! राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, अखेर पोलिसांकडून FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरु 
दिल्ली पेलेट गन हल्ला प्रकरण! राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, अखेर पोलिसांकडून FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरु 
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Embed widget