एक्स्प्लोर

राजकुमारानं अदानी-अंबानींकडून किती वसुल केलेत? शिव्या देणं का बंद केलंय? पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला सवाल

PM Modi Target To Rahul Gandhi: राजकुमारानं अदानी-अंबानींकडून किती वसुल केले? निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदींचा (PM Modi) राहुल गांधींवर (Rahul Gandhi) निशाणा.

PM Modi on Rahul Gandhi : नवी दिल्ली : तेलंगणातील (Telangana) करीमनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) काँग्रेसवर (Congress) जोरदार निशाणा साधला. काँग्रेसनं अचानक अदानी (Adani) -अंबानींची (Ambani) नावं घेणं का बंद केलं? राजकुमारानं अदानी-अंबानींकडून किती वसुल केले? निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी (PM Modi) राहुल गांधींवर (Rahul Gandhi) निशाणा साधत प्रश्न उपस्थित केलेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "तुम्ही पाहिलं असेल की, गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेसचे राजकुमार सकाळी उठल्याबरोबर जपमाळ जपायला सुरुवात करत होते. जेव्हापासून त्यांचं राफेल प्रकरण चर्चेत आलं, तेव्हापासून त्यांनी नवी जपमाळ हातात घेतली, पाच वर्ष एकच जपमाळ जपायचे. पाच उद्योगपती, पाच उद्योगपती... मग हळूच म्हणू लागले, अंबानी-अदानी. मात्र निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांनी अंबानी-अदानींना शिव्या देणंच बंद केलंय, असं का?"

अचानक अंबानी-अदानींचं नाव घेणंच बंद केलंय : पंतप्रधान 

पंतप्रधान मोदींनी बोलताना काँग्रेसला थेट आव्हान देखील केलंय. राजकुमारांनी जाहीर करावं की, त्यांनी अदानी-अंबानींकडून किती वसूल केलेत? असा थेट वार पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केला आहे. मोदी पुढे बोलताना म्हणाले की, "तुमच्याकडे किती काळा पैसा आहे? टेम्पो भरून नोटा काँग्रेसपर्यंत पोहोचल्यात का? काय डील केलीत? तुम्ही रातोरात अंबानी-अदानींना शिव्या देणं बंद केलं. दाल में कुछ काला है... पाच वर्ष अत्याचार केले आणि ते रातोरात थांबले. याचाच अर्थ, टेम्पो भरुन तुम्हाला चोरीचा माल सापडला आहे, याचे उत्तर देशाला द्यावंच लागेल."

"देश बुडाला तर बुडला, त्यांना काहीही फरक पडत नाही"

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "तेलंगणाच्या निर्मितीवेळी येथील लोकांनी बीआरएसवर विश्वास ठेवला होता. बीआरएसनं लोकांची स्वप्न मोडली. काँग्रेसचाही तोच इतिहास आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनंही तेच केलं. देश बुडला तर बुडतो, पण त्याच्या कुटुंबाला काहीच फरक पडत नाही. फॅमिली फर्स्टच्या धोरणामुळे काँग्रेसनं पीव्ही नरसिंह राव यांचा अपमान केला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाला काँग्रेस कार्यालयात प्रवेश दिला गेला नाही. पीव्ही नरसिंह राव यांना भाजप सरकारनं भारतरत्न देऊन गौरवलं." 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur : लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
Narayan Rane : मंत्री संजय शिरसाटांकडून दोन्ही शिवसेनेच्या मिलनाची चर्चा, आता खासदार नारायण राणे म्हणतात, 'माझ्या मते...'
मंत्री संजय शिरसाटांकडून दोन्ही शिवसेनेच्या मिलनाची चर्चा, आता खासदार नारायण राणे म्हणतात, 'माझ्या मते...'
Praful Patel & Nana Patole : कट्टर विरोधक प्रफुल्ल पटेल अन् नाना पटोलेंची गळाभेट; एकाच व्यासपीठावर मनमोकळ्या गप्पा
कट्टर विरोधक प्रफुल्ल पटेल अन् नाना पटोलेंची गळाभेट; एकाच व्यासपीठावर मनमोकळ्या गप्पा
INDIA Alliance : इंडिया आघाडीची शोकांतिका म्हणून पाहू नका, त्याचा आनंदही साजरा करु नये; ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
इंडिया आघाडीची शोकांतिका म्हणून पाहू नका, त्याचा आनंदही साजरा करु नये; ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 02 February 2025Dhananjay Deshmukh Bhagwangad : धनंजय देशमुख-नामदेव शास्त्री यांच्यातील संपूर्ण संभाषण जसंच्या तसंDhananjay Deshmukh Bhagwangad : देशमुखांकडून पुरावे, शास्त्रींचा पाठिंबा;भगवानगडावर नेमकं काय घडलं?Devendra Fadnavis Speechपोलिसांचा खबरी असल्याचा संशय,गडचिरोलीत माजी सभापतीची हत्या फडणवीस म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur : लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
Narayan Rane : मंत्री संजय शिरसाटांकडून दोन्ही शिवसेनेच्या मिलनाची चर्चा, आता खासदार नारायण राणे म्हणतात, 'माझ्या मते...'
मंत्री संजय शिरसाटांकडून दोन्ही शिवसेनेच्या मिलनाची चर्चा, आता खासदार नारायण राणे म्हणतात, 'माझ्या मते...'
Praful Patel & Nana Patole : कट्टर विरोधक प्रफुल्ल पटेल अन् नाना पटोलेंची गळाभेट; एकाच व्यासपीठावर मनमोकळ्या गप्पा
कट्टर विरोधक प्रफुल्ल पटेल अन् नाना पटोलेंची गळाभेट; एकाच व्यासपीठावर मनमोकळ्या गप्पा
INDIA Alliance : इंडिया आघाडीची शोकांतिका म्हणून पाहू नका, त्याचा आनंदही साजरा करु नये; ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
इंडिया आघाडीची शोकांतिका म्हणून पाहू नका, त्याचा आनंदही साजरा करु नये; ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
युवा टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन! भारतीय मुलींनी जिंकला ICC अंडर-19 वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा
युवा टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन! भारतीय मुलींनी जिंकला ICC अंडर-19 वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा
Mumbai News : वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात घरं मार्चमध्ये मिळण्याची शक्यता,556 घरांच्या चाव्या देणार
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात घरं मार्चमध्ये मिळण्याची शक्यता,556 घरांच्या चाव्या देणार
पाकिस्तानात 24 तासात 18 सैनिकांसह 42 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या वाहनांवरही हल्ला; नेमकं काय घडतंय?
पाकिस्तानात 24 तासात 18 सैनिकांसह 42 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या वाहनांवरही हल्ला; नेमकं काय घडतंय?
आमच्या दोन पिढ्या संपल्या, मस्साजोगला 19 पुरस्कार, खरी मानसिकता यांची तपासायची गरज, 40 ते 50 गंभीर गुन्हे; धनंजय देशमुखांनी नामदेव शास्त्रींना आरोपींची कुंडलीच दिली
आमच्या दोन पिढ्या संपल्या, मस्साजोगला 19 पुरस्कार, खरी मानसिकता यांची तपासायची गरज, 40 ते 50 गंभीर गुन्हे; धनंजय देशमुखांनी नामदेव शास्त्रींना आरोपींची कुंडलीच दिली
Embed widget