21 दिवसांत कोरोना व्हायरसला हरवण्यात देश अपयशी का ठरला? : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम
21 दिवसांत कोरोना व्हायरसला हरवण्यात देश अपयशी का ठरला? असा प्रश्न करत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी देशातील कोरोना परिस्थितीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मी भविष्यवाणी केली होती की 30 सप्टेंबरपर्यंत कोरोना संक्रमितांची संख्या 55 लाखापर्यंत पोहचेल. मात्र, आता 20 सप्टेंबरपर्यंत हा आकडा पूर्ण होईल. पंतप्रधान मोदी यांनी 21 दिवसांत कोरोना व्हायरसला हरवू असे म्हटले होते. मग, अन्य देशांना यश आले असताना भारत अपयशी का ठरला? असाही प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे.
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. "मी भविष्यवाणी केली होती की 30 सप्टेंबरपर्यंत कोरोना संक्रमितांची संख्या 55 लाखापर्यंत पोहचेल. मात्र, आता 20 सप्टेंबरपर्यंत हा आकडा पूर्ण होईल. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील कोरोना संक्रमितांची संख्या 65 लाखांपर्यंत पोहचेल" असा अंदाजही चिदंबरम यांनी वर्तवला आहे. परिणामी जगभरात लॉकडाऊनचा फायदा न उठवणारा देश भारत असल्याचेही ते म्हणाले.
मैंने भविष्यवाणी की थी कि 30 सितंबर तक संक्रमितों की संख्या 55 लाख तक पहुंच जाएगी, मैं गलत हूं। भारत 20 सितंबर तक उस संख्या तक पहुंच जाएगा।
सितंबर के अंत तक यह संख्या 65 लाख को छू सकती है। — P. Chidambaram (@PChidambaram_IN) September 5, 2020
21 दिवसांचं काय झालं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संसर्गाच्या सुरुवातीला देशतील जनतेला 21 दिवसांच्या कालावधीत कोरोनाला हरवणार असल्याचे म्हटले होते. मात्र, प्रत्यक्षात या 21 दिवसांत कोरोना संसर्ग अजिबात थांबला नाही. यावरही चिदंबरम यांनी हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, की "पंतप्रधान मोदी यांनी 21 दिवसांत कोरोना व्हायरसला हरवू असल्याचे आश्वासन दिलं होतं. अन्य देश यात यशस्वी ठरत असताना भारत का अपयशी ठरला?" असा प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे.
'सिंघम'सारखा दिखावा करु नका, पंतप्रधान मोदींचा युवा IPS अधिकाऱ्यांना सल्ला
देशाच्या अर्थव्यवस्था निगेटिव्ह आकड्यात : चिदंबरम देशाची अर्थव्यवस्था 2020-21 मध्ये Q1 मध्ये नकारात्मक आकड्यांमध्ये गेली आहे, तरीही अर्थमंत्रालयाने त्यावर चकार शब्द काढला नसल्याचे पी. चिदंमबरम म्हटले आहे. देशाची आर्थिक व्यवस्था अडचणीत आहे. तरीही नागरिकांना फसवण्यासाठी सरकारकडून व्ही V आकारची वसूलीची भविष्यवाणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, लोक हे विसरले नाहीत की अर्थमंत्रालयाने मागील 15 महिन्यांसाठी V आकाराची वसूली करण्याचं आश्वासन दिलं होतं.
US election 2020 | पंतप्रधान मोदी माझे मित्र असून ते चांगलं काम करतायत : डोनाल्ड ट्रम्प