एक्स्प्लोर
Advertisement
उद्धव ठाकरेंना मोदींकडून स्नेहभोजनाचं निमंत्रण
नवी दिल्ली : शिवसेना सातत्याने करत असलेला विरोध टाळण्यासाठी आता भाजपनेच पुढाकार घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत येणाचं निमंत्रण दिलं आहे.
राजधानीत गुढीपाडव्यानंतर भाजपने एनडीएतील घटक पक्षांसाठी स्नेहभोजन आयोजित केलं आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिलं जाणार आहे. त्याचवेळी मोदी शिवसेना-भाजपतील वाद आणि आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडीबाबत शिवसेनेची भूमिका याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करतील, अशी माहिती आहे.
दुसरीकडे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील 'मातोश्री'वर जाण्याची शक्यता आहे. युतीमधील तणाव निवळण्यासाठी भाजपचे मंत्री 29 मार्चला उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत.
दरम्यान, शिवसेनेचे लाड करण्यापेक्षा सरळ मध्यावधी निवडणुका घ्या किंवा इतर पक्षातील संपर्कात असलेले आमदार घेऊन बहुमत सिद्ध करा, या मुद्द्यावर भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. पण त्याआधी उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा, असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. त्यानुसार पाटील आणि मुनगंटीवार उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
बॉलीवूड
बातम्या
Advertisement