(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi In Ayodhya: रामराज्याची संकल्प शक्ती अमृतमहोत्सवात देशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल : पंतप्रधान मोदी
PM Modi In Ayodhya: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते रामाचं दर्शन घेऊन दीपोउत्सवात सहभागी झाले. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत शरयू घाटावर 15 लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्या आले.
PM Modi In Ayodhya: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते रामाचं दर्शन घेऊन दीपोउत्सवात सहभागी झाले. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत शरयू घाटावर 15 लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्या आले. यावेळी लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "श्री रामललाचे दर्शन आणि त्यानंतर राजा रामाचा अभिषेक, हे सौभाग्य रामजींच्या कृपेनेच प्राप्त झाले आहे. जेव्हा श्रीरामाचा अभिषेक होतो तेव्हा प्रभू रामाचे आदर्श आणि संस्कारआपल्यात दृढ होतात."
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात भगवान रामसारखी इच्छाशक्ती देशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. ते म्हणाले की, जी मूल्ये प्रभू रामाने आपल्या शब्दात, विचारात, आपल्या शासनात, प्रशासनात रुजवली. ते सबका साथ-सबका विकासाचे प्रेरणास्थान आणि 'सबका विश्वास-सबका प्रयास'चा आधार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृततुल्य काळात देशाने आपल्या परंपरेचा अभिमान बाळगून गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडायला हवे. भगवान राम कोणाचीही साथ सोडत नाहीत, असं ते म्हणाले आहेत.
Ayodhya| Shri Ramlala's 'Darshan' & then 'Rajyabhishek' of King Ram, this good fortune is obtained only by the grace of Lord Ram. This #Deepavali has come at a time when we've completed 75 years of independence. 'Sankalp Shakti' of Lord Ram will take India to new heights: PM Modi pic.twitter.com/V3DTOR62Fx
— ANI (@ANI) October 23, 2022
भगवान राम के आदर्शों पर चलना हम सभी भारतीयों का कर्तव्य है। pic.twitter.com/LPesR7pNmX
— PMO India (@PMOIndia) October 23, 2022
पंतप्रधान मोदी म्हणाले, भगवान रामाच्या आदर्शांचे पालन करणे हे आपल्या सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. आपण आपल्या आमच्या श्रद्धास्थानांचा अभिमान बाळगला पाहिजे. ते म्हणाले की, आम्ही भारतातील तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा सर्वांगीण दृष्टीकोन समोर ठेवला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवामध्ये देशाने आपल्या वारशाचा अभिमान बाळगावा आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त व्हावे. राम कोणाचीही साथ सोडत नाही, राम कर्तव्यापासून तोंड फिरवत नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
Prime Minister Narendra Modi performs the Rajyabhishek of the symbolic Bhagwan Shree Ram in Ayodhya, Uttar Pradesh pic.twitter.com/fOvZlxpxFU
— ANI (@ANI) October 23, 2022
Ayodhya, Uttar Pradesh | The banks of river Sarayu being lit up with lakhs of earthen lamps for #Deepotsav, on the eve of #Deepavali pic.twitter.com/KGJO4chT2c
— ANI (@ANI) October 23, 2022