(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कुलगाम दहशतवादी हल्ल्यात भाजपच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या; पंतप्रधानांकडून निषेध
मृतात एका भाजपच्या युवा मोर्चाचा जिल्हा सचिवाचा समावेश आहे. अशा प्रकारचा हल्ला पुन्हा करण्याची धमकी या हल्ल्याची जबाबदारी घेतलेल्या TRF या दहशतवादी संघटनेने दिली आहे.
श्रीनगर: जम्मू- काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यामध्ये गुरुवारी रात्री उशिरा भाजपच्या तीन कार्यकर्त्यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेचा निषेध करुन यावर दु:ख व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहले आहे की, "मी माझ्या तीन युवा कार्यकर्त्यांच्या हत्येचा निषेध करतो. ते जम्मू-काश्मीरमध्ये चांगले काम करत होते. या दुखद प्रसंगात माझे विचार त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."
I condemn the killing of 3 of our young Karyakartas. They were bright youngsters doing excellent work in J&K. My thoughts are with their families in this time of grief. May their souls rest in peace. https://t.co/uSfsUP3n3W
— Narendra Modi (@narendramodi) October 29, 2020
कुलगाम जिल्ह्यातील पोरा भागात दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये फिदा हुसेन, उमर हाजम आणि उमर राशिद बेग यांचा समावेश आहे. गोळ्या घातल्यानंतर त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जम्मू-काश्मीर भाजपाने यास हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
जम्मू-कश्मीरचे पूर्व मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरंसचे नेते उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की, "दक्षिण कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातून एक भयंकर बातमी येत आहे. मी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा निषेध करतो. अल्ला त्यांना स्वर्गात जागा देवो आणि त्यांच्या परिवाराला या कठीण प्रसंगाचा सामना करण्याची शक्ती देवो."
Terrible news from Kulgam district of South Kashmir. I unequivocally condemn the targeted killing of the 3 BJP workers in a terror attack. May Allah grant them place in Jannat & may their families find strength during this difficult time.
— Omar Abdullah (@OmarAbdullah) October 29, 2020
'द रेजिस्टंस फ्रंट’ ने हल्ल्याची जबाबदारी स्विकारली
लष्कर-ए-तोयबाच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी 'द रेजिस्टंस फ्रंट' (TRF) या संघटनेने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. आपल्या सोशल मीडियावर टाकलेल्या संदेशात पुन्हा अशा प्रकारच्या हल्ल्याची धमकी देत 'द रेजिस्टंस फ्रंट'ने म्हटले आहे की, "स्मशानभूमीत जागा मिळणार नाही इतक्या लोकांना मारु."
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरु आहे. संपूर्ण परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. याबाबत सर्च ऑपरेशनही सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या :
- फ्रान्समध्ये चर्चच्या बाहेर तीन लोकांची चाकूने हत्या, दहशतवादी हल्ल्याचा अंदाज
- जम्मू काश्मीरमध्ये आता कोणालाही जमीन खरेदी करता येणार, उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय
- मेहबूबा मुफ्ती यांच्या तिरंग्याबद्दलच्या वक्तव्यानं काश्मीरचं राजकीय वातावरण पेटलं
- काश्मीरमध्ये कलम 370 परत लागू करण्याची मागणी, गुपकार ठरावासाठी अब्दुल्ला- मेहबुबा मुफ्तींसह काश्मीरच्या सर्व प्रादेशिक पक्षांची एकी