PM Modi New Ministers List: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्याची यादी; नारायण राणेंचं नाव पहिलं
मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी अनेक विद्यमान मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. आज कोणाचा मंत्रिमंडळात समावेश होणार याची यादी देखील समोर आली आहे.
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर अनेक विद्यमान मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. आज कोणाचा मंत्रिमंडळात समावेश होणार याची यादी देखील समोर आली आहे. या यादीमध्ये पहिलं नाव नारायण राणे यांचं आहे.
महाराष्ट्रातून नव्या विस्तारात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांची यादी
- नारायण राणे
- सर्बानंद सोनोवाल
- डॉ वीरेंद्र कुमार
- ज्योतिरादित्य शिंदे
- रामचंद्र प्रसाद सिंह
- अश्विनी वैष्णव
- पशुपती कुमार पारस
- किरण रिजिजु
- राजकुमार सिंह
- हरदीप सिंह पुरी
- मनसुख मंडाविया
- भुपेंद्र यादव
- पुरुषोत्तम रुपाला
- जी किशन रेड्डी
- अनुराग सिंह ठाकूर
- पंकज चौधरी
- अनुप्रिया सिंह पटेल
- सत्यपालसिंह बघेल
- राजीव चंद्रशेखर
- शोभा करंदलजे
- भानू प्रतापसिंह वर्मा
- दर्शना विक्रम जार्दोस
- मीनाक्षी लेखी
- अन्नपूर्णा देवी
- ए नारायण स्वामी
- कौशल किशोर
- अजय भट
- बीएल वर्मा
- अजय कुमार
- देवूसिंह चौहान
- भगवंत खुबा
- कपिल पाटील
- प्रतिमा भौमिक
- डॉ सुभाष सरकार
- डॉ भागवत कराड
- डॉ राजकुमार रंजन सिंह
- डॉ भारती पवार
- बिश्वेश्वर तुडू
- शंतनू ठाकूर
- डॉ मुंजापारा महेंद्रभाई
- जॉन बार्ला
- डॉ एल मुरुगन
- डॉ निशीत प्रामाणिक
केंद्रामध्ये राज्यातील नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे हे आधीपासून मंत्री होते. संजय धोत्रे यांनी राजानामा दिल्याने आणि आता नव्याने चार मंत्री झाल्यामुळं राज्यात नऊ केंद्रीय मंत्री असणार आहेत. दरम्यान आज 36 नवे मंत्री शपथ घेणार असून 7 राज्यमंत्र्यांचं कॅबिनेट मंत्री म्हणून प्रमोशन झालं आहे. किमान 11 जणांनी राजीनामा आत्तापर्यंत दिला आहे, अशी माहिती आहे.
नेक मंत्र्यांचा मंत्रिमंडळाचा राजीनामा
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह अनेक नेत्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण मंत्रिमंडळ असेल. कारण या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे, यामुळे मंत्रिमंडळाचे सरासरी वय खूपच कमी होईल, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. तसेच मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाल्यापासूनच अनेक मंत्र्यांची जबाबदारी काढून घेतली जाऊ शकते अशा शक्यताही वर्तवण्यात येत होत्या. अशातच मोदी मंत्रिमंडळातील अनेक मोठ्या नेत्यांच्या राजीनाम्याचं सत्र सुरु झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.