PM Modi 3 City Vaccine Tour | पंतप्रधान मोदींचं मिशन व्हॅक्सिन, अहमदाबादच्या लसीचा आढावा घेऊन आता हैदाराबादच्या दिशेने रवाना
PM Modi 3 City Vaccine Tour | देशातील कोरोना विकसीत करणाऱ्या प्रमुख कंपन्यांना भेट देऊन पंतप्रधान लसीच्या विकासासंबंधी आढावा घेत आहेत. सकाळी अहमदाबादच्या दौऱ्यानंतर आता ते हैदराबाद आणि पुण्याला भेट देणार आहेत.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादच्या झायडस कॅडिलाच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा आढावा घेतला आणि ते आता हैदराबादच्या दिशेने रवाना झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या लसीच्या विकासाबाबत काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी तीन शहरांच्या दौऱ्यावर आहेत. त्यात पुणे, अहमदाबाद आणि हैदराबादचा समावेश आहे. अहमदाबादमधील झायडस बायोटेक पार्क, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक या कंपन्यांमध्ये लशीचं उत्पादन करण्यात येत आहे.
या ठिकाणी भेट देऊन कोरोनाच्या लस उत्पादनाची स्थिती काय आहे याचा आढावा पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत.
अहमदाबाद विमानतळावर सकाळी 9 वाजता पंतप्रधान मोदींचे आगमन झालं. त्यांनंतर मोदी झायडस कॅडिला कंपनीच्या दिशेने रवाना झाले. अहमदाबादपासून 20 किमी अंतरावर असणाऱ्या झायडस कॅडिला या कोरोना लस तयार करणाऱ्या कंपनीला पंतप्रधानांनी भेट दिली. पंतप्रधान मोदींनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि कोरोनाच्या लसीच्या विकासाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या.
झायडस कॅडिला ही कंपनी झायकोविड या लशीचे संशोधन करत आहे. या लशीचे दुसऱ्या टप्प्यातील मानवी क्लिनिकल ट्रायल प्रगतीपथावर आहे.
नरेद्र मोदींनी या ठिकाणी एक तासांहून जास्त वेळ व्यतीत केला. त्यानंतर ते हैदराबादच्या दिशेने रवाना झाले.
हैदराबादमध्ये मोदी भारत बायोटेक या लस निर्मीती कंपनीला भेट देणार आहेत. ही कंपनी हैदराबादपासून 50 किमी अंतरावर आहे. भारत बायोटेक, आयसीएमआर आणि एनआयव्ही संयुक्तपणे कोव्हॅक्सिन या लशीवर संशोधन करत आहे.
भारत बायोटेकच्या या लशीचे तिसऱ्या टप्प्यातील माणसांवरचे क्लिनिकल ट्रायल प्रगतीपथावर आहे. क्लिनिकल ट्रायल 26 हजार स्वयंसेवकांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. टप्प्याटप्प्याने स्वयंसेवकांना लस दिली जात आहे.
हैदराबाद भेटीनंतर पंतप्रधान मोदी पुण्याच्या सीरम इंन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. साधारणत: सायंकाळी 4.30 च्या दरम्यानं मोदी या ठिकाणी पोहचतील. या ठिकाणी मोदी जवळपास एक तासांचा काळ व्यतीत करणार आहेत. त्यादरम्यान सीरम इन्स्टिट्यूटतर्फे विकसीत करण्यात येणाऱ्या लसीची सद्यस्थिती, त्याचे उत्पादन,वितरण व्यवस्था याचा आढावा घेणार आहेत.
सीरम इन्स्टिट्यूट ही अॅस्ट्राझेनका आणि ऑक्सफर्डच्या मदतीने कोरोनावर लस बनवत आहे. ही लस अंतिम टप्प्यात आहे. सरकारने याच्या इमर्जंसी ट्रायलला मंजुरी दिली तर ही लस भारतातीयांना नव्या वर्षाच्या सुरुवातीला उपलब्ध शक्यता आहे.
यानंतर सायंकाळी नरेंद्र मोदी परत दिल्लीला रवाना होणार आहेत.