एक्स्प्लोर

भारत बांग्लादेशला जवळपास 30 हजार कोटींचं कर्ज देणार

नवी दिल्ली :  बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. आज या दौऱ्याचा दुसरा दिवस असून, आजच्या द्विपक्षीय चर्चेनंतर उभय देशांमध्ये 22 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यामध्ये आण्विक सहकार्य करारासह विविध सामरिक क्षेत्रातील करारांचा समावेश आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली. यामध्ये दोन्ही देशांचे संबंध अधिकाधिक वृद्धिंगत करण्यावर भर देण्यात आला. यानंतर पंतप्रधान मोदींनी बांग्लादेशला विविध योजनांसाठी 4.5 अब्ज डॉलर्सचं (भारतीय चलनानुसार साडे 29 हजार कोटी) कर्ज देण्याची घोषणा केली. याशिवाय दोन्ही देशांमध्ये रेल्वे सेवा सुरु करण्यासही हिरवा कंदील दाखवला. ही नवी रेल्वे सेवा कोलकाता आणि बांग्लादेशमधील खुलना दरम्यान जुलैपासून सुरु होणार आहे. याशिवाय कोलकाता आणि खुलना दरम्यान बस सेवा सुरु करण्यावरही दोन्ही देशांमध्ये एकमत झालं. यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'दोन्ही देशांमध्ये बस आणि रेल्वे सेवा सुरु झाल्यास दळणवळणाच्या माध्यमातून दोन्ही देशांना फायदा होईल.' विशेष म्हणजे, बांग्लादेशला सैन्य पुरवठ्यासाठी 50 कोटी डॉलर्सचं कर्ज देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी यावेळी केली. हा कर्जपुरवठा बांग्लादेशला गरजेनुसार करण्यात येणार असल्याचं मोदींनी यावेळी स्पष्ट केलं. तिस्ता पाणीवाटप प्रश्नावरील कराराच्या कार्यवाहीसंदर्भात तोडगा निघाला नाही. मात्र, हा मुद्दा दोन्ही देशांसाठी अतिशय महत्त्वाचा असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी नमुद केलं. तसेच भारत यासाठी वचनबद्ध असल्याचं आश्वासनही पंतप्रधान मोदींनी शेख हसीना यांना दिलं. या प्रश्नावर लवकरच तोडगा काढला जाईल, असंही मोदी यावेळी म्हणाले. या चर्चेनंतर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''बांग्लादेश आणि भारत यांनी एकत्रित येऊन दहशतवादाचा सामना केला पाहिजे. भारताने बांग्लादेशच्या समृद्धिसाठी नेहमीच सहकार्य केलं आहे.'' पंतप्रधान पुढे म्हणाले की, ''आमच्या कंपन्या बांग्लादेशच्या कंपन्यांसोबत तेल पुरवण्याचं काम करत आहेत. यासाठी भविष्यातही आम्ही या दिशेनं अनेक सहकार्य करार करु.'' याशिवाय बांग्लादेशच्या मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या भारतीय जवानांचा गौरव करण्यासाठी बांग्लादेशच्या पुढाकाराबद्दल पंतप्रधान मोदींनी गौरवोद्गार काढले. पंतप्रधान म्हणाले की, ''ऊर्जा, सायबर सुरक्षा, सिव्हील न्यूक्लिअरसह अनेक क्षेत्रांमध्ये भारत आपली भागिदारी वाढवत आहे. तसेच आर्थिक मुद्द्यांवरह भारताला बांग्लादेशसोबत काम करण्याची इच्छा आहे.'' शेख हसीना यांच्या दहशतवाद विरुद्ध सुरु केलेल्या झीरो टॉलरेंस धोरणं हे सर्वांसाठी आदर्श असल्याचंही ते यावेळी म्हणाले. रविवारी शेख हसीना भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. यानंतर त्या अजमेर शरिफ दर्ग्यालाही भेट देतील. तर सोमवारी त्या भारतातील प्रसिद्ध उद्योजक आणि आणि दिग्गजांच्या भेटी घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी केंद्रीय उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांच्याकडे पंतप्रधानांसाठी 'मिनिस्टर इन वेटिंग' ही जबाबदारी देण्यात आली आहे. संबंधित बातम्या : बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना 4 दिवसीय भारत दौऱ्यावर

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget