एक्स्प्लोर

मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत,तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू

Indian Railway : मध्य रेल्वेकडून कर्जत आणि लोणावळा दरम्यान दक्षिण-पूर्व 'डाऊन' मार्गिकेची यशस्वीरित्या पुनर्स्थापना केली आहे.

मुंबई : मध्य रेल्वेच्या पथकाने दिनांक १४.०७.२०२६ रोजी कर्जत आणि लोणावळा दरम्यानच्या दक्षिण-पूर्व 'डाऊन' मार्गिकेची यशस्वीरित्या पुनर्स्थापना केली आहे. 'डाऊन' मार्गिकेवरून ३ मालगाड्यांच्या यशस्वी परिचालनानंतर, गाडी क्रमांक 22107 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - लातूर एक्सप्रेस या मार्गावरून धावणारी पहिली प्रवासी गाडी ठरली. ही गाडी दिनांक १४.०७.२०२६ रोजी २३:१८ वाजता कर्जत येथून निघाली, ताशी २० किमी वेगाने हा विभाग पार केला आणि दिनांक १५.०७.२०२६ रोजी ००:२७ वाजता लोणावळा येथे पोहोचली.

गाडी क्रमांक 12123/12124 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन आणि 
गाडी क्रमांक 12127/12128 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा दिनांक १६.०७.२०२६ पासून पूर्ववत केली जाईल.

दिनांक ०६.०७.२०२६ रोजी झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनेनंतर लोणावळा - कर्जत विभागातील सेवा पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेचे पथक गेल्या १० दिवसांपासून अहोरात्र काम करत आहे. मध्य मार्गिका दिनांक ०७.०७.२०२६ रोजी, तर 'डाऊन' मार्गिका दिनांक १४.०७.२०२६ रोजी पूर्ववत करण्यात आली असून, 'अप' मार्गिका पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

घटनास्थळी उपस्थित वरिष्ठ अधिकारी, अभियंते, पर्यवेक्षक आणि १२०० हून अधिक कामगारांचा समावेश असलेले मध्य रेल्वेचे पथक, कठीण भौगोलिक परिस्थितीत आणि आव्हानात्मक वातावरणात २४x७ काम करत आहे. ढिगारा हटवणे, तिसरा ट्रॅक पूर्ववत करणे आणि रेल्वे सेवा लवकरात लवकर सामान्य करणे यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत.

ढिगारा हटवण्याचे काम जलदगतीने करण्यासाठी घटनास्थळी 'बोल्डर स्पेशल ट्रेन', युनिमॅट मशीन, ड्युओमॅटिक मशीन, पोकलेन मशीन्स आणि जेसीबी यांसारखी अवजड यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांना घटनास्थळापर्यंत पोहोचवण्यासाठी शक्य त्या प्रमाणात 'कामगारांसाठी विशेष गाड्या’ देखील चालवल्या जात आहेत. गाड्यांच्या चालविण्याबाबत माहितीसाठी, प्रवासी रेल्वेच्या हेल्पलाईनशी संपर्क साधू शकतात किंवा एनटीइएस ॲप पाहू शकतात.
प्रवाशांच्या माहितीसाठी सोशल मीडियावरही वेळोवेळी अद्यतने दिली जात आहेत.

हे आव्हान पेलताना प्रवाशांनी दाखवलेल्या समंजसपणाबद्दल आणि सहकार्याबद्दल मध्य रेल्वे कृतज्ञता व्यक्त करते; तसेच, यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करते.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget