एक्स्प्लोर

PM Kisan Yojana Next Installment: घरबसल्या करा ई-केवायसी, पीएम किसान योजनेचे 2000 रुपये थेट खात्यावर होणार जमा; जाणून घ्या A टू z प्रोसेस!

PM Kisan Yojana Next Installment: किसान योजनेचे 17 हप्ते जारी करण्यात आले आहेत. आता 18 व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. पुढचा हप्ता मिळण्याआधी शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घेणे आवश्यक आहे.

PM Kisan Yojana Next Installment: भारत सरकार देशातील महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, युवांसाठी त्याचबरोबर सामान्यांसाठी अनेक योजना राबवते. वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. सरकार वृद्धांसाठी काही योजना आणते. तर कुठेतरी महिलांसाठी सरकारी योजना आहेत. भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि आजही भारतातील 50% पेक्षा जास्त लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे केंद्र सरकारही देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवते. ज्याचा शेतकऱ्यांना थेट आर्थिक फायदा होतो.

भारतातील अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न नाहीत. त्यामुळेच शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी भारत सरकारने सन 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षभरात 6000 रुपयांचा आर्थिक लाभ देतात. आतापर्यंत योजनेचे 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता शेतकरी 18 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. पुढचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे, मात्र, त्याआधी शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घेण्याची गरज आहे.

पुढचा हप्ता कधी मिळणार?

भारत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. सरकार ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये पाठवते. आतापर्यंत योजनेचे 17 हप्ते जारी करण्यात आले आहेत. 17 वा हप्ता जून महिन्यात पाठवला होता. त्यामुळे सरकारने 18 वा हप्ता जारी करण्याची माहिती दिली आहे.पुढील महिन्यात म्हणजेच 5 ऑक्टोबर रोजी 18 व्या हप्त्याचे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. मात्र 18 वा हप्ता जाहीर होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी एक गोष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे. ते म्हणजे ई केवायसी, अन्यथा त्यांचे हप्त्याचे पैसे अडकू शकतात.

ई केवायसी आवश्यक 

भारत सरकारने फार पूर्वीच सर्व शेतकऱ्यांना केवायसी करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र अजूनही अनेक शेतकरी आहेत ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. जर तुम्ही तुमचे ई-केवायसी पूर्ण केले नसेल. मग तुमचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे ते लवकरात लवकर पूर्ण करा.

अशा प्रकारे ई-केवायसी करा 

तुम्ही घरबसल्या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला 'फार्मर्स कॉर्नर' (Farmers Corner)चा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला 'e-KYC' चा पर्याय दिसेल आणि त्यावर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल आणि नंतर 'ओटीपी मिळवा' (OTP) वर क्लिक करा. यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो तिथे भरल्यानंतर, सेव्ह करा. तुमचे ई-केवायसी केले जाईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
तानाजी सावंत राजभवनावर फिरकलेच नाहीत, हॉटेलमध्येच पॅक केली बॅग; महायुतीत मिठाचा खडा
तानाजी सावंत राजभवनावर फिरकलेच नाहीत, हॉटेलमध्येच पॅक केली बॅग; महायुतीत मिठाचा खडा
Deepak Kesarkar : शपथविधी मंत्र्यांचा असतो तर अधिवेशन आमदारांचं असतं, दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदेना भेटायला गेलो पण आमदारांची गर्दी होती, त्यामुळं पुन्हा... दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
बारामतीत चाणक्य लिहिलेला देवेंद्र फडणवीसांचा बॅनर पेटवला, पोलीस धावले, घटनास्थळी तणाव
बारामतीत चाणक्य लिहिलेला देवेंद्र फडणवीसांचा बॅनर पेटवला, पोलीस धावले, घटनास्थळी तणाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Cabinet Expansion FULL : नितेश राणे ते भरत गोगावले, शपथविधी सोहळ्याचा FULL VIDEOSanjay Shirsat  : तर 6 महिन्यांत सुद्धा घरी बसवणार अडीच वर्षाचा फॉर्मुलावर शिरसाट स्पष्टच म्हणाले..Bharatshet Gogawale Oath : 'मी भरतशेठ गोगावले...' म्हणत घेतली मंत्रिपदाची शपथMaharashtra Cabinet Expansion :फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी, कुणा-कुणाला मंत्रिपदाची शपथ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
तानाजी सावंत राजभवनावर फिरकलेच नाहीत, हॉटेलमध्येच पॅक केली बॅग; महायुतीत मिठाचा खडा
तानाजी सावंत राजभवनावर फिरकलेच नाहीत, हॉटेलमध्येच पॅक केली बॅग; महायुतीत मिठाचा खडा
Deepak Kesarkar : शपथविधी मंत्र्यांचा असतो तर अधिवेशन आमदारांचं असतं, दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदेना भेटायला गेलो पण आमदारांची गर्दी होती, त्यामुळं पुन्हा... दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
बारामतीत चाणक्य लिहिलेला देवेंद्र फडणवीसांचा बॅनर पेटवला, पोलीस धावले, घटनास्थळी तणाव
बारामतीत चाणक्य लिहिलेला देवेंद्र फडणवीसांचा बॅनर पेटवला, पोलीस धावले, घटनास्थळी तणाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2024 | रविवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2024 | रविवार 
Prakash Abitkar & Hasan Mushrif : प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री, 'माझा'च्या बातमीवर शिक्कामोर्तब; महायुती सरकारमध्ये हसन मुश्रीफ एकमेव मुस्लीम चेहरा, दादांकडूनही मानाचे पान!
प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री, 'माझा'च्या बातमीवर शिक्कामोर्तब; महायुती सरकारमध्ये हसन मुश्रीफ एकमेव मुस्लीम चेहरा, दादांकडूनही मानाचे पान!
Maharashtra Cabinet expansion : महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात किती लाडक्या बहिणी? कोणत्या पक्षाच्या किती महिलांनी घेतली शपथ?
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात किती लाडक्या बहिणी? कोणत्या पक्षाच्या किती महिलांनी घेतली शपथ?
Nagpur Oath Ceremony: महायुतीच्या 39 मंत्र्यांची शपथ, 4 लाडक्या बहिणींना संधी, पुणे, बीडसह अनेक जिल्ह्यात जल्लोष ; A टू Z स्टोरी
महायुतीच्या 39 मंत्र्यांची शपथ, 4 लाडक्या बहिणींना संधी, पुणे, बीडसह अनेक जिल्ह्यात जल्लोष ; A टू Z स्टोरी
Embed widget