Fact Check: 'PM कन्या आशीर्वाद योजने'तून मुलींना केंद्र सरकारकडून खरंच दीड लाखांची मदत मिळते? काय आहे सत्य...
Fact Check : मुलींना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून 1.50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे, सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल होतोय.
PM Kanya Ashirwad Yojana Fact Check : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ मेसेज खूप व्हायरल (Viral Message Fact Check) होत आहे. यामध्ये असा दावा केलाय की, देशातील मुलींना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून 1.50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल होत आहे, या मेसेजमागील सत्य जाणून घेणं गरजेचं आहे.
केंद्र सरकारकडून 'प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजना' अंतर्गत मुलींना दीड लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते, हा मसेज सध्या व्हायरल होत आहे. एका यूट्यूब चॅन्सलमार्फत हा दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दाव्यावर विश्वास करण्यात आधी याची सत्यता पडताळणं गरजेचं आहे. कारण यामधून तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
पीआयबीने वरील व्हायरल मेसेजचं फॅक्ट चेक केलं आहे. हा व्हायरल मेसेज खरा आहे की खोटा याबाबत पीआयबीनं फॅक्ट चेकद्वारे सांगितलं आहे. प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजना (PM Kanya Ashirwad Yojana) अशी कोणताही योजना केंद्र सरकारमार्फत चालवली जात नाही.
PIB ने दाखवला आरसा -
सोशल मीडियावरील अथवा बनावट बातम्यापासून लोकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकर पीआयबीद्वारे जागृती करते. व्हायरल होणाऱ्या बातम्यांचं फॅक्ट चेक करत पीआयबी आरसा दाखवण्याचं काम करत असते. पीआयबीच्या अधिकृत सोशल मीडियावर अनेक व्हायरल मेसेजचं फॅक्ट चेक करण्यात आले आहे. यामध्ये पीआयबीनं केंद्र सरकरकडून 'पीएम कन्या आशीर्वाद योजना' (PM Kanya Ashirwad Yojana) या नावाची कोणताही योजना चालवली जात नसल्याचं सांगितलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा दावा पूर्णपणे खोटा आहे, अशा दाव्याला कुणीही बळी पडू नये. तसेच असा मेसेज कुणालाही फॉरवर्ड अथवा शेअर करु नये, असे पीआयबीकडून सांगण्यात आलेय.
सरकारी गुरु' नामक एक #YouTube चैनल की एक वीडियो में दावा किया गया है कि 'प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजना' के तहत सभी बेटियों को ₹1,50,000 की राशि मिलेगी।#PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 7, 2022
▶️ यह दावा फ़र्ज़ी है।
▶️ केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही है। pic.twitter.com/TmBh2BWZuX
कोणत्याही व्हायरल मेसेजचं तुम्हीही करु शकता फॅक्ट चेक -
जर तुम्हाला आलेल्या एकाद्या मेसेजवर संशय आल्यास, तुम्ही ते पीआयबीमार्फत फॅक्ट चेक करु शकता. पीआयबीनं फॅक्ट चेक करण्याची सुविधा दिली आहे. त्यासाठी तुम्हाला पीआयबीच्या अधिकृत https://factcheck.pib.gov.in/ या संकेतस्थळावर जावे लागेल. तिथे तुम्ही तुम्हाला आलेला व्हायरल मेसेजची सत्यता पडताळून पाहू शकता. अथवा 8799711259 या व्हॉट्सअपवर अथवा pibfactcheck@gmail.com यावर मेल करुन व्हायरल मेसेजची सत्यता पडताळून पाहू शकता. कोणत्याही गोष्टींची माहिती जाणून घेण्याआधी त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सायबर फ्रॉडला बळी पडू शकता.