एक्स्प्लोर
पेट्रोलपंप चालकांचं 'इंधन खरेदी बंद' आंदोलन तूर्तास मागे
मुंबई: पेट्रोलपंप चालकांनी दोन दिवस पुकारलेलं 'इंधन खरेदी बंद' आंदोलन आज तूर्तास मागे घेण्यात आलं आहे. तेल वितरक आणि पेट्रोलपंप चालकांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पेट्रोल पंप चालकांना डिझेलमध्ये १० पैसे आणि पेट्रोलमध्ये १३.८ पैसे कमिशनची वाढ देण्याचं तेल कंपन्यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे तूर्तास तरी हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. याबाबत तसा लेखी करारही करण्यात आला आहे.
पेट्रोल पंप चालकांच्या अन्य मागण्यांबाबतही निर्णय घेण्यासाठी एक समिति नियुक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, इंधन खरेदी बंद आंदोलनाचा परिणाम आज राज्यात ठिकठिकाणी पेट्रोल पंपावर पाहायला मिळाला. अनेक पेट्रोल पंपवर पेट्रोल, डिझेल संपल्याचे फलक पाहायला मिळाले.
संबंधित बातम्या:
पंप मालकांच्या खरेदी बंदमुळे पेट्रोल पंपांवर खडखडाट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement