Petrol Storage Rules : घरात किती पेट्रोल साठवू शकता? मर्यादा ओलांडली तर काय शिक्षा? जाणून घ्या नियम
Petrol Diesel Storage Rules : पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत लोकांमध्ये चिंता वाढल्याचं दिसतंय. अशा परिस्थितीत घरात एकावेळी किती पेट्रोल ठेवता येतं आणि कायदेशीर नियम काय सांगतात, याची सविस्तर माहिती.

Petrol Diesel Storage Rules : पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात काही ठिकाणी पेट्रोलबाबत भीतीचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळतंय. काहीजण पेट्रोल पंपावर रांगा लावत आहेत, तर काहीजण घरात पेट्रोल साठवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सरकारनं स्पष्ट केलंय की देशात पेट्रोल किंवा गॅसचा कोणताही तुटवडा नाही. अशा परिस्थितीत घरात पेट्रोल साठवण्याचे नियम काय आहेत, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.
Petrol Storage Limit India : घरात किती पेट्रोल ठेवू शकता?
भारतात पेट्रोल आणि डिझेलसारख्या ज्वलनशील पदार्थांच्या साठवणुकीसाठी कडक नियम आहेत. पेट्रोलियम अॅक्ट 1934 आणि पेट्रोलियम रूल्स 2002 नुसार, कोणताही विशेष परवाना नसताना घरात जास्तीत जास्त 30 लिटर पेट्रोल किंवा डिझेल ठेवण्याचीच परवानगी आहे. हे पेट्रोल सुरक्षित कंटेनरमध्येच ठेवणं बंधनकारक आहे.
Legal Action Rules : मर्यादा ओलांडली तर काय होईल?
जर कोणी व्यक्ती 30 लिटरपेक्षा जास्त पेट्रोल परवान्याशिवाय साठवत असेल, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. यात दंडासोबतच तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. पेट्रोल अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे मोठ्या प्रमाणात साठवणूक करणे धोकादायक मानलं जातं.
Safety Guidelines : पेट्रोल साठवताना घ्यायची काळजी
पेट्रोल नेहमी हवेशीर जागेत ठेवावं. घराच्या आत, विशेषतः स्वयंपाकघर किंवा राहण्याच्या खोलीत ठेवणं टाळावं. शक्यतो गॅरेज किंवा वेगळ्या शेडमध्ये ठेवणं सुरक्षित असतं. तसेच पेट्रोलजवळ आग, सिगारेट किंवा उष्णता निर्माण करणाऱ्या वस्तू ठेवू नयेत. साध्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल ठेवणंही धोकादायक ठरू शकतं.
No Panic Advice : घाबरू नका, नियम पाळा
सरकारकडून वारंवार सांगितलं जातंय की इंधन पुरवठा सुरळीत आहे. त्यामुळे अनावश्यक साठेबाजी करण्याची गरज नाही. योग्य माहिती घेऊन आणि नियमांचं पालन करूनच सुरक्षित राहणं हेच शहाणपणाचं आहे.
ही बातमी वाचा:





















