एक्स्प्लोर
पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर 1.06 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 2.94 रुपये प्रति लिटर वाढले आहेत. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.
15 एप्रिललाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली होती. मात्र, 15 दिवसांचा अवधी संपत नाही, तोच दर वाढले आहेत. त्यामुळे 15 दिवसांपूर्वी दिलासा मिळालेल्या जनतेला पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांना सामोरं जावं लागणार आहे.
त्याहीआधी 5 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले होते. म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. त्यानंतप पंधरवड्याने दर कमी झाले आणि आता पुन्हा महागलं आहे.
वाचा : पेट्रोल भरताना तुमची अशी फसवणूक तर होत नाही ना?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
रायगड
जळगाव
Advertisement