एक्स्प्लोर
5 ऑक्टोबरच्या तुलनेत पेट्रोल 11.79 रुपयांनी स्वस्त
पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी पेट्रोलच्या किमतीत 22 पैशांनी घट केली. डिझेलच्या किमती 23 पैशांनी घटल्यानंतर गेल्या नऊ महिन्यातला नीचांक गाठला आहे.
नवी दिल्ली : सततच्या इंधनदरवाढीने वैतागलेल्या वाहनचालकांना वर्षअखेरीस मोठा दिलासा मिळाला आहे. 2018 मधील इंधनाच्या दरांचा ताळेबंद मांडल्यास पेट्रोल सरत्या वर्षातील अत्यंत कमी दरात विकलं जात आहे. 5 ऑक्टोबरच्या तुलनेत पेट्रोलचे दर काल (29 डिसेंबर 2018) 11 रुपये 79 पैशांनी घटले आहेत.
पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी पेट्रोलच्या किमतीत 22 पैशांनी घट केली. डिझेलच्या किमती 23 पैशांनी घटल्यानंतर गेल्या नऊ महिन्यातला नीचांक गाठला आहे.
एका दिवसाचा अपवाद वगळता 18 ऑक्टोबरपासून सतत पेट्रोलच्या किमतीत घट पाहायला मिळत आहे. पाच ऑक्टोबरला मुंबईत पेट्रोलची विक्री 86.97 रुपयांना झाली होती. ती आता 75.18 रुपयांवर पोहचली आहे.
16 ऑगस्टपासून इंधन दरवाढीला सुरुवात झाली होती. त्यानंतर कित्येक दिवस पेट्रोल-डिझेलचे दर विनाब्रेक वाढतेच होते. 16 ऑगस्टपासून 5 ऑक्टोबरपर्यंत पेट्रोलचे दर 6.86, तर डिझेल 6.73 रुपयांनी वधारले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किमती वधारल्यामुळे भाव वाढल्याचं सांगितलं जात होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement