Petrol-Disel Price Hike : देशात 4 मे ते 14 जून दरम्यान 25 वेळा इंधन दरवाढ तर पहिल्यांदाच देशात डिझेल शंभरीपार
Petrol-Disel Price Today : पेट्रोलनंतर देशात प्रथमच डिझेलचे दर ही शंभरच्या पार गेले आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगर येथे डिझेलचे दर 100. 36 रुपये प्रतिलीटर पोहोचले.
मुंबई : अगोदरच कोरोना आणि लॉकडाऊनने होरपळलेल्या सामान्य नागरिकांना इंधन दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. मागच्या दीड महिन्यात पेट्रोल 6 रुपये तर डिझेल हे 6 रुपये 55 पैशांनी महागले आहे. ज्यामुळे देशातील अनेक शहरांत पेट्रोल 110 रुपयांकडे वाटचाल करतंय तर डिझेल ही शंभरी पार झाल आहे. आजही तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल 28 पैसे तर डिझेलची 30 पैशांनी दरवाढ केली.ज्यामुळे आज परभणीत पेट्रोल हे 104 रुपये 94 पैसे तर डिझेल हे 95 रुपये 52 पैशांवर गेले आहे.
देशात प्रथमच डिझेलचे दर 100 रुपयांवर
पेट्रोलनंतर देशात प्रथमच डिझेलचे दर ही शंभरच्या पार गेले आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगर येथे डिझेलचे दर 100. 36 रुपये प्रतिलीटर पोहोचले. त्यापाठोपाठ ओडिशामध्ये मलकानगिरी येथे डिझेलचे दर 100. 05 रुपये प्रतिलीटर होते. राजस्थानातील हनुमानगढ आणि ओडिशातील कोरापूट येथेही डिझेलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत.
नांदेड जिल्ह्यात पेट्रोल डिझेल दराचा भडका
नांदेड जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून सतत इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. गेल्या एका महिन्यात पट्रोल 7 रुपये 87 पैसे तर डिझेल दरात 6 रुपये 47 पैसे एवढी दरवाढ झाली आहे. आज नांदेड जिल्ह्यात पेट्रोल दर 104 रुपये 87 पैसे तर डिझेल 95 रुपये 87 पैसे दर आहेत.
राज्यातील प्रमुख शहरांमधील आजचे इंधन दर
- परभणी
पेट्रोल - 104 रुपये 94 पैसे
डिझेल - 95 रुपये 52 पैसे
- सोलापूर
पेट्रोल - 102 रुपये 42 पैसे
डिझेल - 93 रुपये 11 पैसे
एक्स्ट्रा प्रीमिअम - 105.84
- औरंगाबाद
पेट्रोल - 103 रुपये 61 पैसे
डिझेल - 94 रुपये 24 पैसे
- बीड
पेट्रोल - 103 रुपये 61 पैसे
डिझेल - 94 रुपये 25 पैसे
- जालना
पेट्रोल - 103 रुपये 74 पैसे
डिझेल - 94 रुपये 37 पैसे
चार महानगरांतील पेट्रोलच्या किमती :
दिल्ली : 96.41 रुपये प्रति लिटर
मुंबई : 102.58 रुपये प्रति लिटर
कोलकाता : 96.34 रुपये प्रति लिटर
चेन्नई : 97.69 रुपये प्रति लिटर
चार महानगरांतील डिझेलच्या किमती
दिल्ली : 87.28 रुपये प्रति लिटर
मुंबई : 94.70 रुपये प्रति लिटर
कोलकाता : 90.12 रुपये प्रति लिटर
चेन्नई : 91.92 रुपये प्रति लिटर