एक्स्प्लोर

Petrol Diesel Stock : भारताकडे किती दिवसांचा पेट्रोल, डिझेल आणि LPG साठा? मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर केंद्र सरकारचं मोठं स्पष्टीकरण

PM Narendra Modi Appeal On Petrol Diesel : पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर मंत्रिमंडळाच्या गटाची महत्त्वाची बैठक पार पडली असून त्यामध्ये पेट्रोल, डिझेल, LPG साठ्याच्या आढावा घेण्यात आला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल-डिझेल आणि गॅसचा वापर जपून करण्याचं आवाहन केल्यानंतर केंद्र सरकारने महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. देशात पेट्रोल, डिझेल, एलपीजी किंवा कच्च्या तेलाचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. भारताकडे 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.

पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मंत्रिमंडळाच्या गटाच्या बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी देशातील ऊर्जा सुरक्षेचा आढावा घेतला. या बैठकीत भारताने आवश्यक इंधनाचा पुरेसा साठा करून ठेवला असून पुरवठा साखळी अखंडित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्याचं सांगण्यात आलं.

Petrol Diesel Stock in India : भारताकडे 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा

सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताकडे 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा, 60 दिवसांचा नैसर्गिक वायू साठा आणि 45 दिवसांचा एलपीजी साठा उपलब्ध आहे. याशिवाय देशाचा परकीय चलन साठा सुमारे 703 अब्ज डॉलरच्या मजबूत पातळीवर असल्याचंही सांगण्यात आलं.

Fuel Supply in India : पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नाही

भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण करणारा देश असून 150 हून अधिक देशांना पेट्रोलियम उत्पादने निर्यात करतो. देशांतर्गत मागणी पूर्णपणे भागवली जात असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याची किंवा इंधन साठवण्याची गरज नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं.

PM Modi Fuel Saving Appeal : इंधन बचतीमागील आर्थिक कारणे

पंतप्रधान मोदी यांनी 10 मे रोजी देशवासियांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचं, सार्वजनिक वाहतूक वापरण्याचं आणि शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा विचार करण्याचं आवाहन केलं होतं. यामुळे इंधन आयातीवरील खर्च कमी होऊन परकीय चलनाची बचत होईल, असा सरकारचा उद्देश आहे.

Oil Marketing Companies Loss : तेल कंपन्यांचा मोठा आर्थिक भार

सरकारच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतीचा भार सामान्य नागरिकांवर पडू नये म्हणून भारतातील तेल विपणन कंपन्या दररोज सुमारे 1,000 कोटी रुपयांचे नुकसान सहन करत आहेत. पहिल्या तिमाहीत त्यांच्या वसुलीत सुमारे 2 लाख कोटी रुपयांची घट झाल्याचंही सांगण्यात आलं.

Government Appeal : नागरिकांनी घाबरू नये

केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की देशातील इंधन पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवर गर्दी करण्याची किंवा अतिरिक्त साठा करण्याची आवश्यकता नाही. नागरिकांनी संयम बाळगून इंधनाचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Independence Day 2026: स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? 2026 पर्यंत लोकसंख्येत किती वाढ? 
स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? देशाच्या लोकसंख्येत 2026 पर्यंत किती वाढ?
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget