Petrol Diesel Rate Today : देशात पेट्रोल-डिझेलचे दर वधारले की, घसरले? झटपट चेक करा तुमच्या शहरांतील किमती
Petrol Diesel Rate Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली असताना दुसरीकडे भारतीय इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत.
Petrol Diesel Rate Today 7 October 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे (शुक्रवार) पेट्रोल-डिझेलचे लेटेस्ट दर (Crude Oil Production) जारी केले आहेत. भारतात आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) स्थिर असून त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबई (Mumbai), दिल्ली (Delhi), कोलकाता आणि चेन्नईसह देशातील सर्वच शहरांमध्ये वाहनांच्या इंधनाचे दर (Fuel Price) स्थिर आहेत.
सरकारी कंपन्यांद्वारे जारी करण्यात आलेल्या नव्या किमतींनुसार, देशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. तर देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर झाला आहे. तसेच, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. तर, पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती काय?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा प्रति बॅरल 100 डॉलरच्या दिशेनं जात आहेत. कच्च्या तेलाचे दर शुक्रवारी 90 डॉलर प्रति बॅरलच्या जवळ पोहोचला आहे. ब्रेंट क्रूड 94.58 आणि WTI प्रति बॅरल 88.68 डॉलरवर पोहोचले आहेत.
देशातील महानगरांतील किमती काय?
शहरं | पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) | डिझेलच्या किमती (प्रति लिटर) |
मुंबई | 106.31 रुपये | 94.27 रुपये |
दिल्ली | 96.72 रुपये | 89.62 रुपये |
चेन्नई | 102.74 रुपये | 94.33 रुपये |
कोलकाता | 106.03 रुपये | 92.76 रुपये |
राज्यातील प्रमुख शहरांत दर काय?
- नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
- औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर
तुमच्या मोबाईलवरही पाहता येणार इंधन दर
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price) मोबाइलवरही इंधन दर पाहता येतील. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
OPEC Crude Oil: महागाईचा भडका उडणार? OPEC च्या निर्णयाने इंधन दरात वाढ होण्याची भीती