एक्स्प्लोर
इंधन दरात दहाव्या दिवशी वाढ, देशात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत
इंधन दर शंभरीकडे वेगाने वाटचाल करत आहेत. पेट्रोल आणि डिझेलमध्ये 30 पैशांची वाढ झाली आहे.
मुंबई: कर्नाटक निवडणुकीनंतर सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली असून, इंधन दर शंभरीकडे वेगाने वाटचाल करत आहेत. पेट्रोल आणि डिझेलमध्ये 30 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलने 86 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
देशात सर्वात महाग पेट्रोल- डिझेल महाराष्ट्रात आहे. अधिक स्पष्ट करायचं झालं तर अमरावतीत देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल आहे.
अमरावतीत पेट्रोल 86.22 रुपये तर डिझेल 73.94 रुपये आहे. त्याखालोखाल सिंधुदुर्गात पेट्रोल 86.01 रुपये तर डिझेल 72.69 रुपये प्रति लिटर आहे.
तर औरंगाबादमध्ये पेट्रोल 85.93 रुपये तर डिझेल 73.73 रुपये आहे.
मुंबईतील पेट्रोलचा दर 85 रुपये तर डिझेल 72 रुपये 66 रुपयांवर पोहोचलं आहे.
पाकिस्तानपेक्षा भारतात पेट्रोल 33 रुपये प्रति लिटरने महाग कशामुळे?
कर्नाटक निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. कर्नाटक निवडणुकीच्या काही दिवस आधी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. त्यानंतर मागील 8 दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.
मोदी सरकारच्या काळात इंधन सर्वात महाग
दिल्लीत आज पेट्रोल 77 रुपये 17 पैशांवर आहे. दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे जे दर आहेत, ते भारताच्या आजपर्यंतच्या इतिहासात कधीही नव्हते. मनमोहन सिंह सरकारच्या काळात पेट्रोलने 14 सप्टेंबर 2013 रोजी सर्वाधिक 76.6 रुपयांचा दर गाठला होता.
केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक
गेल्या 10 दिवसांमध्ये दररोज इंधनाचे दर वाढले आहेत. सलग दहाव्या दिवशी इंधनाचे दर वाढले असताना, मोदी सरकार यावर तोडगा काढणार का याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
... तर पेट्रोल 53 रुपये आणि डिझेल 41 रुपये लिटरने मिळेल
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक होत आहे. या बैठकीत इंधन दरवाढीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
पाकिस्तानपेक्षा भारतात पेट्रोल 33 रुपये प्रति लिटरने महाग कशामुळे?
... तर पेट्रोल 53 रुपये आणि डिझेल 41 रुपये लिटरने मिळेल
पेट्रोल-डिझेलची आगेकूच, स्वत:चा विक्रम मोदींनी अनेकवेळा मोडला!
पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी गाठला नवा उच्चांक
कर्नाटक निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागलं!
कर्नाटक निवडणुकीनंतर झटका, पेट्रोल-डिझेल महागलं
मुंबईसह राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा भडकले!
पेट्रोलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement