एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price : सलग 32 दिवस दिलासा! आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; जाणून घ्या तुमच्या शहरांतील किमती

Petrol-Diesel Price Today 8th May 2022 : पेट्रोल-डिझेलच्या दरात आजही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मागील एक महिन्यापासून इंधनाचे दर स्थिर आहेत.

Petrol-Diesel Price Today 8th May 2022 : पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) वाढत्या किमतींपासून सलग 32 दिवस सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. भारतीय पेट्रोल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल (Petrol Price) -डिझेलचे नवे (Diesel Price) दर जाहीर केले असून, त्यानुसार शनिवारच्या तुलनेत तेलाच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच, आज देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या महिन्यात 6 एप्रिल रोजी तेलाच्या किमतीत 80-80 पैशांनी वाढ झाली होती. तेव्हापासून तेलाचे दर वाढलेले नाहीत. जाणून घेऊया, आज दिल्लीपासून मध्य प्रदेशपर्यंत देशातील सर्व राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत? 

रविवारी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर काय?

देशाची राजधानी दिल्लीत रविवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. विशेष म्हणजे, पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याचा आजचा 32 वा दिवस आहे. रविवारी दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 96.67 रुपये आहे.

मुंबईत काय स्थिती? 

देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 120.51 रुपये, तर एक लिटर डिझेलसाठी 104.77 रुपये मोजावे लागत आहेत. 

इंडियन ऑईलनं जारी केलेल्या किमतींनुसार, पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलची किंमत 91.45 रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 123.47 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्च नंतर सलग 14 वेळा दरवाढ केली होती. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल 10.20 रुपयांनी महाग झालं होतं. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

देशातील महत्त्वाच्या शहरांचे दर काय? 

शहरं  पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई 120.51 104.77 
दिल्ली 105.41  96.67
चेन्नई 110.85 100.94 
कोलकाता  115.12 99.83
हैद्राबाद 119.49  105.49 
कोलकाता 115.12  96.83
बंगळुरू  111.09  94.79 

दररोज बदलतात पेट्रोल-डिझेलच्या किमती 

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती अपडेट करतात. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pushpa 2 Premiere Stampede: 'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार, दोघांची प्रकृती गंभीर
'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony :Maharashtra Superfast News :महायुती सरकारचा शपथविधी : 05 Dec 2024 :ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : सकाळी 8 च्या हेडलाईन्स एबीपी माझा : 05 Dec 2024 : ABP MajhaMahayuti Oath Ceremony : शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?सरकारमध्ये सामील व्हावं,आमदारांचा आग्रहTop 70 News : सकाळी 7  च्या 70 महत्वाच्या बातम्यांचा आढावा : 05 DEC 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pushpa 2 Premiere Stampede: 'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार, दोघांची प्रकृती गंभीर
'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Nana Patole: शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
Mahayuti Oath Taking Ceremony: पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Embed widget