Petrol-Diesel Price : रशिया-युक्रेनमधील तणाव निवळल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत घट; देशातील स्थिती काय?
Petrol-Diesel Price Today 16 February 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत घसरण. जाणून घ्या देशातील स्थिती काय?
Petrol-Diesel Price Today 16 February 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी आज (बुधवार) पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या (Diesel) दरात कोणताही बदल केलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आहे. तरिही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol-Diesel Rates) स्थिर आहेत. देशात 4 नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 96 डॉलर प्रति बॅरलपर्यंत गेले होते. मागील सात वर्षांतील हा सर्वाधिक उच्चांकी दर होता. मात्र, रशिया-युक्रेनमधील तणाव काहीसा निवळल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात (Crude Oil) तीन टक्क्यांनी घट झाली. रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं वाढ होत होती. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलरच्या पुढे जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. मंगळवारी 15 फेब्रुवारी रोजी रशियानं युक्रेनच्या सीमेवरून 1.30 लाख सैन्य मागे घेत असल्याचं वृत्त आलं. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या.
सध्या देशात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. याच पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर (Petrol Price Today) असल्याचं बोललं जात आहे. अशातच निवडणुकांनंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा कडाडणार असल्याचं बोललं जात आहे. कच्च्या तेलाच्या भावात 2014 सालानंतर पहिल्यांदाच मोठी वाढ झाली आहे. भारताला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. निवडणुकांनंतर भारतातील पेट्रोल-डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देशात 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. केंद्र सरकारनं पेट्रोलच्या उत्पादन शुल्कावर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर घट केली होती. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आलं. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत.
महाराष्ट्रात एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर अद्यापही शंभरीपार आहेत. जाणून घेऊयात मुंबई, पुण्यापासून नाशिकसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत...