एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठी घट; एका लिटरसाठी किती पैसे?

Petrol-Diesel Price Today : मोदी सरकारनं देशावासियांना दिवाळीचं गिफ्ट दिलं असून पेट्रोलच्या किमतीत 5 रुपयांची, तर डिझेलच्या किमतीत 10 रुपयांची घट करण्यात आली आहे.

Petrol-Diesel Price Today 04 November 2021, iocl.com : केंद्र सरकारच्या वतीनं देशातील जनतेला दिवाळीचं (Diwali 2021) मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. काल (बुधवारी) केंद्रीय अर्थ मंत्रालयानं (Finance Ministry) दोन्ही इंधनाच्या दरांवरील सेंट्रल एक्साइज ड्यूटी (Excise Duty Cut) मध्ये घट करणार असल्याची घोषणा केली होती. पेट्रोलवर यामध्ये 5 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवर 10 रुपयांची घट करण्यात आली आहे. आजपासून हे नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे आज मुंबईतील एक लिटर पेट्रोलची किंमत 109.98 रुपये आहे. तर डिझेलची किंमत  94.14 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. 

दिल्लीत इंडियन ऑइल (Indian Oil) च्या पेट्रोल पंपावर (Petrol Price) प्रति लिटर 6.07 रुपयांनी घट होऊन 103.97 रुपयांवर पोहोचलं आहे. काल (बुधवारी) याची किंमत 110.04 रुपये होती. याप्रमाणे डिझेलच्या दरांत 11.75 रुपयांची घट होऊन 86.67 रुपये प्रति लिटरपर्यंत आलं आहे. काल (बुधवारी) याची किंमत 98.42 रुपये प्रति लिटर इतकी होती. 

गेल्या 26 दिवसांत 8.15 रुपयांनी महागलं होतं पेट्रोल  

गेल्या सप्टेंबर महिन्यात 28 तारखेला पेट्रोलचे 20 पैशांनी महागलं होतं. तर डिझेल 25 पैसे प्रति लिटरनं महागलं होतं. दरम्यान, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली. तर गेल्या मंगळवारपर्यंत हे दरवाढीचं सत्र सुरुच राहिलं. मधे काही दिवस या दरवाढीला स्थिरता मिळाली. तसेच गेल्या 26 दिवसांत पेट्रोलची किंमत 8.15 रुपये प्रति लिटरनं महागलं होतं. 

29 दिवसांत 9.45 रुपयानं महागलं डिझेल 

गेल्या महिन्यात पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या दरांत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तसं पाहिलं तर पेट्रोलच्या तुलनेत डिझेल तयार करणं अधिक खर्चिक आहे. पण भारताच्या खुल्या बाजारात पेट्रोल महाग आणि डिझेल स्वस्त विकलं जाते. गेल्या 24 सप्टेंबरपासून डिझेलच्या दरांत वाढ होण्यास सुरुवात झाली होती. ही दरवाढ गेल्या आठवड्यात मंगळवारी येऊन थांबली होती. यावेळी पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या दरांत मोठी वाढ झाली होती. गेल्या 29 दिवसांत ते 9.35 रुपये प्रति लिटर महागलं आहे.  

देशातील महानगरांतील दर काय?

आज दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काय जाणून घ्या

देशातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
मुंबई 109.98 94.14
दिल्ली  109.69 98.24
कोलकाता 104.67 89.79
चेन्नई 101.40 91.43

पेट्रोल-डिझेलच्या दरांत का होतेय सातत्यानं वाढ? 

जगभरात कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशातच पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, परंतु, उत्पादन मात्र कमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओपेक देशांची बैठक पार पडली, त्यामध्ये दररोज केवळ 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. जेव्हा जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, त्यावेळी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होणं, सामान्य बाब आहे. 

पेट्रोल-डिझेल GSTमध्ये घेण्यासाठी का तयार नाही केंद्र आणि राज्य सरकार?

केंद्र सरकारनं कर प्रणालीमध्ये सुधारणांची गरज असल्याचं कारण देत जीएसटी (GST) लागू केला होता. पण जीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच देशातील बहुतांश राज्य सरकारचंही हेच मत आहे की, पेट्रोल-डिझेलचा जीएसटीच्या कक्षेत समावेश केला जाऊ नये. पण का?  यामुळे काय फायदा होणार? यांसारखे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले आहेत. जाणून घेऊया यामागील कारणं... 

पेट्रोल-डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याची केंद्र सरकारसोबत राज्य सरकारचीही इच्छा नाही. कारण सरकारला चिंता आहे ती, देशाच्या तिजोरीची. सामान्य माणसाला दिलासा देता-देतो, देशाच्याच तिजोरीत खडखडाट होण्याची भिती सरकारला वाटतेय. जर पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीच्या कक्षेत केला, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती अर्ध्या होणार. आजच्या किमतीनुसार जर अंदाज लावला तर, पेट्रोल 56 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 55 रुपये प्रति लिटर विकलं जाईल. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन?
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? यादीत महाराष्ट्राचा नंबर कितवा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणारABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन?
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? यादीत महाराष्ट्राचा नंबर कितवा?
Devendra Fadnavis Office Attack: फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेचं नाव उघड करण्यास नकार,  'त्या' पोलिसांचीही चौकशी होणार?
पर्स आतमध्ये राहिल्याचे कारण सांगून मंत्रालयात शिरली, त्या महिलेने फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर काय-काय तोडलं?
Pune Crime News: पुण्यातील प्रोफेसरच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, आरोपी बड्या बापाची मुलं,  धंगेकरांच्या पत्राने एकच खळबळ
पुण्यातील प्रोफेसरच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, आरोपी बड्या बापाची मुलं, धंगेकरांच्या पत्राने एकच खळबळ
Hasan Mushrif on Satej Patil : सतेज पाटलांचा निकालानंतर भ्रमनिरास होईल, मंत्रिपद मिळालं नसल्याचं दुःख; हसन मुश्रीफांचा खोचक टोला
सतेज पाटलांचा निकालानंतर भ्रमनिरास होईल, मंत्रिपद मिळालं नसल्याचं दुःख; हसन मुश्रीफांचा खोचक टोला
Rajaram Sakhar Karkhana : कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
Embed widget