एक्स्प्लोर

Petrol Diesel Price : गॅस सिलिंडर स्वस्त झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलमध्येही दिलासा, जाणून घ्या आजचे ताजे दर

Petrol Diesel Price Today : महाराष्ट्र, मेघालय वगळता देशभरात तब्बल 102 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर. तुमच्या शहरांतील दर काय?

Petrol Diesel Price Today 01 September 2022 : वाढत्या महागाईनं सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. अशातच महिन्याच्या पहिल्या दिवशी, एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना 100 रुपयांचा दिलासा मिळाला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर कमी केलेले नाहीत. भारतील तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर आज सकाळी 6 वाजता जाहीर करण्यात आले. त्यानुसार, मेघालय आणि महाराष्ट्र वगळता राजस्थान, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह सर्व राज्यांमध्ये सलग 103 दिवस पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड 2.84 टक्क्यांनी घसरून 96.49 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कच्चं तेल 0.59 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 89.07 डॉलरवर आलं आहे. मोदी सरकारनं 21 मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. तेव्हापासून देशात पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल 7 रुपये प्रति लिटरनं स्वस्त झालं आहे. तर राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकारनं 14 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपयांची कपात केली होती. तेव्हापासून राज्यातही पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com नं जारी केलेल्या दरांनुसार, आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ अथवा घट केलेली नाही. नव्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनुसार, आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.

महाराष्ट्रातील इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

शहर पेट्रोलच्या किमती  डिझेलच्या किमती
मुंबई 106.25 94.22
पुणे  105 92
नागपूर  106.03 92.58
नाशिक 106.74 93.23
हिंगोली 107.29 93.80
परभणी 108.92 95.30
धुळे  106.05 92.58 
नांदेड  108.24 94.71
रायगड  105.96 92.47
अकोला  106.05 92.55
वर्धा  106.56 93.10
नंदुरबार  106.99 93.45
वाशिम 106. 37 93.37
चंद्रपूर 106.14 92.70
सांगली  105.96 92.54
जालना 107.76  94.22

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget