एक्स्प्लोर

आखाती देशात तणाव, भारतात पेट्रोल शंभरी गाठणार?

आखाती देशातल्या तणावामुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव खूपच वधारले आहेत.

मुंबई: येत्या नव्या वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरभक्कम वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचं बजेट केवळ कोलमडणारच नाही, तर गाडी चालवायची की नाही याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. पश्चिम आशियाई देशातल्या तणावामुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव खूपच वधारले आहेत. त्यामुळे भारतातील पेट्रोलचे दर 30 टक्कांनी वाढून ते शंभरच्या घरात पोहचण्याची चिन्हं आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाच्या भाववाढीचा फायदा रशिया, कोलंबिया, मलेशिया आणि ब्राझीलसारख्या देशांना होईल. तर चीन, भारत, इंडोनेशिया, थायलंड, दक्षिण अफ्रिका आणि तुर्कीसारख्या देशांना मात्र याची झळ बसणार आहे. येमेनमधल्या बंडखोरांचा समाचार घ्यायला सौदी अरेबिया युद्धात उतरण्याची शक्यता आहे आणि तसे झाले, तर सौदी अरेबिया इराणच्या विरोधात उभे ठाकेल. या पार्श्वभूमीवर तेलाचे भाव गगनाला भिडण्याची चिन्हं जास्त आहेत. केंद्रात मोदी सरकार सत्तारुढ झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली. एकवेळ अशी होती की हे दर अवघ्या २४ डॉलर प्रतिबॅरलवर आले होते. पण आता मध्यपूर्वेतल्या तणावामुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या बॅरलचे भाव ८० डॉलर्सच्या आसपास आहेत. येणाऱ्या काळात त्यात ३० टक्के वाढ होऊन ते १०० डॉलर्सच्या पार जातील असा अंदाज नोमुरा या आर्थिक विश्लेषक कंपनीने व्यक्त केलाय.
  • सध्या भारतात पेट्रोलचा दर ७७ रूपयांच्या आसपास आहे.
  • तो १०० रूपये पार होण्याची शक्यता आहे.
  • डिझेलच्या दरातली वाढही लक्षणीय असेल.
  • परिणामी अन्नधान्य, भाजीपाला, प्रवास मोठ्या प्रमाणात महागण्याची शक्यता आहे.
तेलाच्या भाववाढीचा फायदा रशिया, कोलंबिया, मलेशिया आणि ब्राझीलसारख्या देशांना होईल. तर चीन, भारत, इंडोनेशिया, थायलंड, दक्षिण अफ्रिका आणि तर्कीसारख्या देशांना मात्र याची झळ बसणार आहे. येमेनमधल्या बंडखोरांचा समाचार घ्यायला सौदी अरेबिया युद्धात उतरण्याची शक्यता आहे आणि तसे झाले, तर सौदी अरेबिया इराणच्या विरोधात उभे ठाकेल. या पार्श्वभूमीवर तेलाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियाई देशातल्या या तणावाचा थेट परिणाम जागतिक बाजारातील तेलाच्या भावावर होण्याची शक्यता आहे. परिणामी, जगभरात महागाईदेखील वाढेल, अशी भीती ‘नोमुरा’ने आपल्या अहवालात व्यक्त  केली आहे. त्यामुळे आधीच अडचणींनी घेरलेल्या मोदी सरकारची डोकेदुखी वाढणार हे निश्चित.

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Bhagirath Chaudhary: भाजपच्या केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी आपल्याच मंत्रालयाकडून शेतीच्या अनुदानपोटी 99 लाख लाटले, बोभाटा होताच नाईलाजाने केले परत
भाजपच्या केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी आपल्याच मंत्रालयाकडून शेतीच्या अनुदानपोटी 99 लाख लाटले, बोभाटा होताच नाईलाजाने केले परत
Jitendra Singh on Rahul Gandhi : राहुल गांधी यांना पंतप्रधान बनण्याची महत्त्वाकांक्षा, जितेंद्र सिंह यांचा दावा, मोदींच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनाचं कारण सांगितलं...
राहुल गांधी यांना पंतप्रधान बनण्याची महत्त्वाकांक्षा, जितेंद्र सिंह यांचा लोकसभेत दावा

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!

Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
Embed widget