Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; एक लिटर पेट्रोलसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Petrol-Diesel Price Today 16 December 2021 : इंधन कंपन्यांनी ग्राहकांना मोठा दिलासा आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर...
Petrol-Diesel Price Today 16 December 2021 : भारतीय तेलं कंपन्यांनी गुरुवारी सकाळी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. जवळपास दीड महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना दिलासा देत उत्पादन शुल्कात कपात केली होती. तेव्हापासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.
IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.
देशातील प्रमुख महानगरांतील दर
देशातील प्रमुख शहरं | पेट्रोलची किंमत प्रति लिटर | डिझेलची किंमत प्रति लिटर |
मुंबई | 109.98 | 94.14 |
दिल्ली | 95.41 | 86.67 |
चेन्नई | 101.40 | 91.43 |
कोलकाता | 104.67 | 89.79 |