एक्स्प्लोर
पेट्रोल-डिझेलची आगेकूच, स्वत:चा विक्रम मोदींनी अनेकवेळा मोडला!
मुंबईत या घडीला पेट्रोलचे दर प्रती लीटर 84 रुपये 73 पैसे तर डिझेलचे दर 72 रूपये 36 पैसे झाले आहेत.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवसेंदिवस आपलाच रेकॉर्ड मोडताना दिसत आहे. कारण सर्वोच्च पातळी गाठलेल्या इंधन दराने आगेकूच कायम ठेवली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच आहेत.
कर्नाटक निवडणुकीनंतर सलग नवव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. कर्नाटकमध्ये प्रचार संपतो ना संपतो तोच, इकडे तोटा भरुन काढण्याच्या नावाखाली पेट्रोल- डिझेलचे दर दररोज वाढत आहेत.
आज पेट्रोल 33 पैशांनी तर डिझेल 15 पैशांनी वाढलं आहे. इंधनाचे दर पैशात वाढत असले, तरी त्याचा परिणाम रुपयात होतो.
त्यामुळे मुंबईत या घडीला पेट्रोलचे दर प्रती लीटर 84 रुपये 73 पैसे तर डिझेलचे दर 72 रूपये 36 पैसे झाले आहेत.
या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी आजवरचा सर्वात उच्चांक गाठला आहे.
गेल्या 8 दिवसांपासून सतत होणाऱ्या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी हा नवा उच्चांक गाठला आहे. मागील चार आठवड्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सतत वाढत आहेत.
कर्नाटक निवडणुकीच्या काही दिवस आधी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. त्यानंतर मागील 8 दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.
दुसरीकडे दिल्लीत पेट्रोल 76.87 रुपये तर डिझेल 68 रुपये महागलं आहे.
इंधनाच्या सातत्याने दरवाढीच्या पार्श्वभूमीवर इंडियन ऑईल आज पत्रकार परिषद घेणार आहे.
मोदी सरकारच्या काळात इंधन सर्वात महाग
दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे जे दर आहेत, ते भारताच्या आजपर्यंतच्या इतिहासात कधीही नव्हते. मनमोहन सिंह सरकारच्या काळात पेट्रोलने 14 सप्टेंबर 2013 रोजी सर्वाधिक 76.6 रुपयांचा दर गाठला होता.
दरवाढीचं कारण
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. सध्याचे दर 2014 च्या तुलनेत जास्त आहेत. हे सर्व कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाल्याने होत आहे.
येत्या काळात अमेरिकेने इराणवर काही निर्बंध लादले, तर पुरवठा आणखी घटेल आणि त्याचा फटका बसून, आणखी दरवाढ होईल.
संबंधित बातम्या
पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी गाठला नवा उच्चांक
कर्नाटक निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागलं!
कर्नाटक निवडणुकीनंतर झटका, पेट्रोल-डिझेल महागलं
मुंबईसह राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा भडकले!
पेट्रोलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement